Sports

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

MI beat GT, IPL 2026: गुजरात टायटन्सने आपले मागील सलग तीन सामने जिंकले होते, तर मुंबईने आपले चारही सामने गमावले होते. पण यावेळी दोन्ही संघांसाठी चित्र बदललं .

Bharat Jadhav

  • मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२६ मधील पहिला विजय

  • गुजरात टायटन्सवर ९९ धावांनी मोठा पराभव

  • टिळक वर्मा आणि अश्विनीचा उत्कृष्ट खेळ

आयपीएल २०२६ चा ३० वा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या स्टेडियमवर झालेल्या सामन्यात एका संघाची विजयाची आणि एकाच्या परायजची मालिका खंडित झाली. सलग चार सामने गमावल्यानंतर, पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने अखेर विजयाची चव चाखली आहे. आयपीएल २०२६ मधील पहिला सामना जिंकल्यानंतर सलग पराभवांना सामोरे जाणाऱ्या मुंबईने, गुजरात टायटन्सला ९९ धावांनी पराभूत केले.

तिलक वर्माच्या पहिल्या आयपीएल शतकाच्या जोरावर मुंबईने १९९ धावा केल्या. यानंतर गोलंदाजीच्यावेळी सलग सहा सामन्यांमध्ये एकही बळी न मिळवलेल्या जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्या षटकात पहिली विकेट घेऊन संघाला गोलंदाजीत भक्कम सुरुवात करून दिली.त्यानंतर, या हंगामातील आपला पहिला सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज अश्विनी कुमारने ४ बळी घेऊन मुंबईचा विजय निश्चित केला.

तिलकच्या शतकाने मुंबईला वाचवलं

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ च्या ३० व्या सामन्यात गुजरात टायटन्सला आपल्याच चाहत्यांसमोर दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु जेव्हा सामना सुरू झाला, तेव्हा याची कोणालाही वाटलं नव्हतं की गुजरातला पराभव स्वीकारावा लागेल. गुजरात संघाचा गोलंदाज कागिसो रबाडाच्या (३/३३) वेगवान गोलंदाजीने पॉवरप्लेमध्येच मुंबईला अवघ्या ४४ धावांत तीन धक्के दिले. पण त्यानंतर नमन धीरने (४५) एक शानदार खेळी करून संघाला सावरले आणि त्यांना १०० धावांच्या जवळ पोहोचवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT