Players of Delhi Capitals celebrate after completing a record-breaking run chase against Rajasthan Royals. saam tv
Sports

RR vs DC: दिल्ली कॅपिटल्सचा रॉयल विजय; IPL च्या इतिहासातील सर्वात मोठा रनचेज

IPL 2026 Delhi Capitals Win: दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना ७ गडी राखून जिंकला आहे. या हंगामातील आपला चौथा विजय नोंदवला.

Bharat Jadhav

  • दिल्ली कॅपिटल्सचा ऐतिहासिक विजय

  • २२५ धावांचा मोठा पाठलाग यशस्वी

  • राजस्थान रॉयल्सचा पराभव

इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामातील ४३वा साखळी सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झाला. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ७ गडी राखत रॉयल विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरआरच्या संघाने २० षटकांत ६ गडी गमावून २२५ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष्य १९.१ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले.

राजस्थान रॉयल्स संघाने दिलेल्या २२६ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या सलामी जोडीने जबरदस्त कामगिरी केली. केएल राहुल आणि पथुम निस्संका या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी करून भक्कम सुरुवात करून दिली. निस्संकाने ३३ चेंडूंमध्ये ६२ धावा केल्या. तेथून पुढे केएल राहुल आणि नितीश राणा यांनी धावगती मंदावू न देता डावाला पुढे नेले. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली.

नितीश राणा ३३ धावांवर बाद झाला, तर केएल राहुलने ७५ धावांची शानदार खेळी केली. दिल्लीने १७७ धावांवर तीन गडी गमावल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयाकडे नेण्याची जबाबदारी घेतली. यांनी चौथ्या विकेटसाठी २३ चेंडूंमध्ये ४९ धावांची भागीदारी करून संघाला या सामन्यात विजय मिळवून दिला. या सामन्यात स्टब्सने १८, तर आशुतोषने नाबाद २५ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

राजस्थान रॉयल्सची सामन्याची सुरुवात खराब झाली. धावसंख्या अवघी १२ असताना त्यांचे दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परतले. त्यानंतर रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनी डाव सावरला. त्यांनी ५९ चेंडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची वेगवान भागीदारी करून संघाला सामन्यात प्राण ओतले. या सामन्यात ४२ धावा करून जुरेल पॅव्हेलियनमध्ये परतला, तर परागने ९० धावांची शानदार खेळी केली.

डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या डोनावन फरेराने अवघ्या १४ चेंडूंमध्ये सहा षटकार आणि दोन चौकारांसह नाबाद ४७ धावा करून राजस्थानची धावसंख्या २०० च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांमध्ये मिचेल स्टार्कने तीन बळी घेतले, तर काईल जेमिसन, अक्षर पटेल आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकण मुख्य चौकात पाण्याचं साम्राज्य; गटार तुंबल्याने महामार्गावर पाणी

Heatwave News: उकाड्याचा कहर! जगातील सर्वात उष्ण 20 शहरांमध्ये भारतातील शहरांचा समावेश, पाहा संपूर्ण लिस्ट

Weight Loss: जाड मांड्या आणि हिप्सवरील चरबी कमी करायची आहे? आहारात समाविष्ट करा हे ७ पदार्थ

देशाच्या राजकारणात काही तरी मोठं घडणार? भाजपची २२ लोकसभा अन् ८ राज्यसभा खासदार असलेल्या पक्षावर नजर

Mumbai Metro Line 11: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सर्वात महत्त्वाच्या अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्पाला वेग; काम कुठंपर्यंत आलं?

SCROLL FOR NEXT