Ricky Ponting  
क्रीडा

IPL 2025: रिकी पाँटिंग 'या' IPL संघाचा झाला कोच; १० वर्षांत एकदाही प्लेऑफ नाही; पंटर कमाल करणार?

Ricky Ponting : पंजाब किंग्सला नवा प्रशिक्षक मिळालाय. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पॉटिंगला आयपीएल २०२५ साठी नवा प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलंय.

Bharat Jadhav

आयपीएल २०२५ सुरु होण्याआधी या टुर्नामेंटमधील संघांमध्ये मोठे बदल होत आहेत. पंजाब किंग्सनेही आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल केलाय. संघ व्यवस्थापनाने नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आलीय. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉटिंग आता पंजाब किंग्स संघाचे प्रशिक्षक असणार आहेत. पॉटिंगने वर्ष २०२४ च्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडली होती. दरम्यान आता पॉटिंगकडून पंजाबच्या संघाला अपेक्षा लागून आहेत.

आयपीएल सुरू झाल्यापासून पंजाबचा संघाने एकदाही प्लेऑफचा टप्पा गाठला नाहीये. यामुळे रिकी पॉटिंगला कोच म्हणून नियुक्त केल्यानंतर संघाच्या नवीन आशा जाग्या झाल्या आहेत. दोन महिन्याआधीच पॉटिंगने दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. पॉटिंग आता पंजाबचा कोच म्हणून भूमिका साकारणार आहे. प्रशिक्षक होताच पॉंटिंग इतर कोचिंग स्टाफमध्ये बदल करेल. पंजाब किंग्सने मागील ७ वर्षापासून ६ कोच बदलेले आहेत. पॉटिंग हे या संघाचे ६ वे कोच असतील.

पॉटिंग वर्ष २००८ पासून आयपीएलचे सदस्य राहिलाय. २००८ मध्ये तो आधी केकेआर संघाचा खेळाडू होता. त्यानंतर तो मुंबई संघाचा बॅटिग प्रशिक्षक झाला होता, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती, त्यावेळी पॉंटिंग हा प्रशिक्षक होता. वर्ष २०१४ मध्ये पॉटिंग मुंबई संघाचा मार्गदर्शक होता. वर्ष २०१५ ते २०१६ मध्ये मुंबई संघाचा हेड कोच भूमिका निभावली होती. वर्ष २०१८ मध्ये पॉटिंग दिल्ली कॅपिटल्सच्याच कोचिंग सेटअपचा एक सदस्य होता.

दरम्यान शिखर धवनने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे शिखर धवन आयपीएल 2025 मध्ये भाग घेणार नाही. आयपीएल 2025 च्या लिलावात पंजाबच्याही नजरा त्यांच्या नवीन कर्णधारावर असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेवर जाणार का? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?

Saam Exit Poll : ठाकरे गटाची तोफ धडाडणार? गुहागर कोण जिंकणार? एक्झिट पोलचा अंदाज आला

Maharashtra Exit Poll: सावंतवाडीमधून शिंदे गटाचे दीपक केसरकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Nallasopara Exit Poll: नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की बहुजन विकास आघाडी कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

World : जगातील 'या' देशात १२ नाही तर आहेत चक्क 13 महिने

SCROLL FOR NEXT