IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यामध्ये बंगळुरूने प्रथम फलंदाजी केली. गोलंदाजी करताना चेन्नईच्या खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणात अनेक चुका झाल्याचे पाहायला मिळाले. चौथ्या ओव्हरमध्ये कॅच पकडताना रवींद्र जडेजा आणि मथीशा पथिराना यांची जोरदार टक्कर झाली. यात आरसीबीच्या जेकब बेथलला जीवनदान मिळाले. त्यानंतर जेकबने सीएसके विरुद्ध अर्धशतकीय खेळी केली. दरम्यान जडेजा आणि पथिरानाच्या टक्करचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी अंशुल कम्बोज आला. पाचव्या चेंडूवर स्ट्राईकवर असणाऱ्या जेकब बेथलने जोरदार शॉट मारला. पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. चेंडू पकडण्यासाठी मथीशा पथिराना डिप बॅकवर्ड पॉईंटजवळ धावत गेला. तेव्हा शॉट थर्डवरुन रवींद्र जडेजाही कॅच पकडण्यासाठी आला. कॅच पकडण्यासाठी दोघे आले आणि एकमेकांवर आदळले. जडेजाची हनुवटी आणि चेहऱ्याचा डावा भाग पथिरानाच्या तोंडावर आपटला. यानंतर पथिराना जमिनीवर कोसळला. त्यानंतर पथिरानावर औषधोपचार करण्यात आले.
आयपीएल २०२५ च्या ५२ व्या सामन्यामध्ये बंगळुरू विरुद्ध चेन्नई सामन्यामध्ये महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले. सलामीसाठी आलेल्या विराट कोहली आणि जेकब बेथल या दोघांनी अर्धशतकीय खेळी केली.
चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार) आयुष म्हात्रे, शेख रशीद, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीपक हूडा, अंशुल कम्बोज, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पथिराना
(इम्पॅक्टचे पर्याय - शिवम दुबे, आर. अश्विन, जेमी ओवर्टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग ११ -
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, जेकब बेथल, देवदत्त पड्डिकल, रोमारियो शेपर्ड, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, यश दयाल
(इम्पॅक्टचे पर्याय - सुयश शर्मा, रसिख डार, मनोज भांडगे, लियाम लिविंगस्टन, स्वप्नील सिंह)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.