ipl  twitter
Sports

IPL 2025 Mega Auction: मुंबईकर रिकाम्या हातीच परतले! रहाणेसह 2 स्टार खेळाडू अन्सोल्ड

Ajinkya Rahane Unsold: आयपीएल लिलावात मुंबईचे स्टार खेळाडू अन्सोल्ड राहिले आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल मेगा लिलावाचा थरार सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये सुरु आहे. या लिलावातील पहिल्या दिवशी स्टार खेळाडूंवर रेकॉर्डब्रेक बोली लागली. दुसऱ्या दिवसाच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्याच सेटमध्ये मुंबईकर खेळाडूंना धक्का बसला आहे.

मुंबईचे ३ स्टार खेळाडू अन्सोल्ड

लिलावातील दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहणेचं नाव आलं. अजिंक्य रहाणेची बेस प्राईज १.५० कोटी रुपये होती. मात्र कुठल्याही संघाने त्याला खरेदी करण्यात रस दाखवलेला नाही. गेल्या हंगामात तो चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसून आला होता. मात्र या लिलावात कुठल्याही संघाने त्याच्यावर बोली लावलेली नाही.

पृथ्वी शॉ अन्सोल्ड

आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉला दिल्लीने आगामी हंगामापूर्वी रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा पृथ्वी शॉ गेल्या हंगामात पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याची ही फ्लॉप कामगिरी पाहता कुठल्याही संघाने त्याच्यावर बोली लावलेली नाही. त्याने आपली बेस प्राईज ७५ लाख रुपये ठेवली होती. मात्र तरीही त्याला खरेदीदार मिळालेला नाही .

शार्दुल ठाकुर

गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या शार्दुल ठाकुरला या हंगामात कुठल्याही संघाने बोली लावलेली नाही. गेल्या हंगामात तो दुखापतग्रस्त झाला होता. यासह काही महिन्यांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळताना दिसून आलेला नाही. त्यामुळे कुठल्याही संघाने त्याच्यावर बोली लावण्यात रस दाखवलेला नाही.

न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू अन्सोल्ड

भारताचे हे स्टार खेळाडू अन्सोल्ड झालेच, यासह न्यूझीलंडच्या खेळाडूंनाही संघांनी खरेदी करण्यात रस दाखवलेला नाही. संघाचा कर्णधार केन विलियन्सनवर कुठल्याही संघाने बोली लावलेली नाही. यासह ग्लेन फिलिप्सही अन्सोल्ड राहिला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT