Virat Kohli Reaction Video X (Twitter)
Sports

Virat Kohli Reaction : 6, 6, 6.. टीम डेव्हिडचे लागोपाठ 3 षटकार, विराटची 'ती' रिअ‍ॅक्शन व्हायरल, Video

Virat Kohli Reaction Video : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याच्या पहिल्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये टीम डेव्हिडने लागोपाठ ३ षटकार मारले. तेव्हाची विराट कोहलीची रिअ‍ॅक्शन व्हायरल होत आहे.

Yash Shirke

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही लढत रंगली आहे. आज आयपीएलमधला आणखी एक रोमांचक सामना खेळला जात आहे. या सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या खेळाडूंनी २० ओव्हर्समध्ये १९६ धावा केल्या.

फिल सॉल्टने बंगळुरूची दमदार सुरुवात केली. पण तो लवकर बाद झाला. पुढे विराट कोहली आणि देवदत्त पडिकल सोबत खेळू लागले. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारने खेळ सावरला. त्याने ३२ धावांमध्ये अर्धशतकीय खेळी केली. पाटीदार बाद झाल्यानंतर अन्य खेळाडू कमी धावांवर बाद होऊन तंबूत परतले.

शेवटच्या ओव्हरमध्ये टीम डेव्हिड आणि भुवनेश्वर कुमार खेळत होते. टीम डेव्हिड पहिला बॉल डॉट म्हणून खेळला. त्यानंतर टीम डेव्हिडने सलग ३ बॉल्सवर ३ जोरदार सिक्स मारले. तीन बॉल्समध्ये त्याने १८ धावा काढल्या. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या १९० पार गेली. टीम डेव्हिडने मारलेल्या सिक्सवर चाहत्यांसह विराट कोहली आणि अन्य आरसीबी संघातील खेळाडूंनी दमदार प्रतिक्रिया दिली. त्यातल्या त्यात विराटच्या रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बंगळुरूची प्लेईंग ११ -

विराट कोहली, फिल साल्ट, देवदत्त पडिकल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल.

चेन्नईची प्लेईंग ११ -

रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, सॅम करन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराणा, खलील अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT