IPL 2024 Qualifier 1: Kolkata Knight Riders VS Sunrisers Hyderabad Records in Playoffs twitter
Sports

KKR VS SRH Qualifier 1: कोलकाता की हैदराबाद; कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? पाहा प्लेऑफमध्ये दोन्ही संघांचा रेकॉर्ड

Kolkata Knight Riders VS Sunrisers Hyderabad Playoffs Record: आयपीएल २०२४ स्पर्धेच्या प्लेऑफच्या सामन्यांना आजपासून प्रारंभ होणार आहे. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

Ankush Dhavre

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये क्वालिफायर १ चा सामना रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी ७: ३० वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर १ सामना गमावणारा संघ एलिमिनेटर जिंकणाऱ्या संघासोबत खेळताना दिसेल.

प्लेऑफमध्ये कसा राहिलाय कोलकाता नाईट रायडर्सचा रेकॉर्ड?

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आठव्यांदा प्लेऑफमध्ये खेळताना दिसणार आहे. या संघाने प्लेऑफमध्ये आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने ८ सामने जिंकले आहेत. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. क्वालिफायर १ मध्ये खेळताना कोलकाता नाईट रायडर्सचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये झालेल्या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने क्वालिफायरचे सामने जिंकले होते.

कसा राहिलाय हैदराबादचा रेकॉर्ड?

सनरायझर्स हैदराबादचा संघ सातव्यांदा प्लेऑफचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाने ५ सामने जिंकले आहेत. तर ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सनरायझर्स हैदराबादने २०१६ मध्ये झालेल्या हंगामात जेतेपदाला गवसणी घातली होती.

त्यानंतर २०१८ मध्ये झालेल्या क्लालिफायर १ च्या सामन्यात हैदराबादला चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर २०१८ मध्ये झालेल्या अंतिम फेरीतही चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

कोणता संघ मारणार बाजी?

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांनी आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. या दोन्ही संघांचा प्लेऑफचा रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ २ वेळेस एलिमिनेटरचा सामना खेळण्यासाठी आमनेसामने आले आहेत. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने एका सामन्यात बाजी मारली आहे.

तर सनरायझर्स हैदराबादला देखील एक सामना जिंकण्यात यश आलं आहे. त्यानंतर २०१८ मध्ये क्लालिफायर २ च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. या दोन्ही संघांचा प्लेऑफमधील रेकॉर्ड पाहिला, तर सनरायझर्स हैदराबादचा संघ आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

SCROLL FOR NEXT