IPL 2024 Playoffs teams schedule and time table in marathi amd2000 saam tv news
क्रीडा

IPL 2024 Playoffs: प्लेऑफचे ४ संघ ठरले! कुठे, केव्हा अन् कधी होणार सामने? वाचा सविस्तर

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील अखेरचा सामना हा टॉप २ वर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार होता. या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने हा सामना नाणेफेक न होताच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. याचा कोलकाता नाईट रायडर्स संघाला तर फायदा झाला मात्र राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

हा सामना रद्द झाल्याने राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांचे प्रत्येकी १७-१७ गुण झाले आहेत. नेट रन रेट चांगला असल्याने हैदराबादचा संघ दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर राजस्थान रॉयल्सचा संघ तिसऱ्या स्थानी सरकला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना जिंकला असता तर दुसऱ्या स्थानी जाण्याची संधी होती.

या दोन संघांमध्ये रंगणार क्वालिफायरचा सामना

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ ठरले आहेत. ज्यात कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या ४ संघांचा समावेश आहे. क्वालिफायर १ चा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना २१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर जो संघ पराभूत होईल त्या संघाला आणखी एक संधी मिळेल.

एलिमिनेटर १ चा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना २२ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. तर जिंकणारा संघ क्वालिफायर २ सामन्यात क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेल्या सामन्यात खेळताना दिसेल. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ क्वालिफायर १ जिंकलेल्या संघासोबत अंतिम सामना खेळताना दिसेल. हा सामना चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT