vaibhav suryavanshi twitter
Sports

Vaibhav Suryavanshi: वय वर्ष फक्त १३! वैभव सूर्यवंशीवर या संघाने लावली कोटींची बोली

Vaibhav Suryavanshi, IPL 2025 Mega Auction: युवा १३ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीवर राजस्थान रॉयल्सवर मोठी बोली लावली आहे.

Ankush Dhavre

बिहारचा १३ वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. आयपीएल लिलावात सर्वात युवा खेळाडू म्हणून नाव नोंदवणाऱ्या वैभवला राजस्थान रॉयल्सने १.१० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे. त्याची बेस प्राईज ३० लाख रुपये होती. हा खेळाडू पहिल्यांदाच आयपीएल खेळताना दिसणार आहे.

वैभव सूर्यवंशी भारतीय अंडर १९ संघाकडून खेळताना दिसून आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या यूथ कसोटी मालिकेत त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. या मालिकेत फलंदाजी करताना त्याने अवघ्या ५८ चेंडूत वादळी शतकी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने १४ चौकार आणि ४ षटकार मारले होते. वैभव सूर्यवंशी आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे फ्रेंचायझींनी त्याच्यावर पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली.

नाव येताच लागली मोठी बोली

लिलावात वैभव सूर्यवंशीचं नाव येताच, फ्रेंचायझींनी पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात झाली. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी त्याच्यावर बोली लावायला सुरुवात केली. त्याचे ट्रायल्स दिल्लीमध्येच झाले होते. वयाच्या ७ वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय. त्याला सरावाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ३ तास प्रवास करावा लागायचा.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा खेळाडू

वैभव सूर्यवंशी आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी प्रयास रे बर्मन या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरला होता. तो १६ वर्षांचा असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला आपल्या संघात घेतलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT