Rishabh Pant Yandex
क्रीडा

CSK Vs DC : विजयाचं खातं उघडूनही रिषभ पंतचं टेन्शन वाढलं! सामन्यानंतर BCCI ची मोठी कारवाई

CSK vs DC Rishabh Pant Fined News : चेन्नईने आतापर्यंत दोन सामने जिंकले, मात्र दिल्लीविरोधात सीएसके ढेर झाली. दिल्लीने २० धावांनी सामना जिंकूनही संघाच्या कर्णधाराला १२ लाखांचा दंड बसला आहे.

Vishal Gangurde

CSK vs DC Rishabh Pant Fined:

चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यान आयपीएलचा १३ वा सामना झाला. या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा धुव्वा उडवला. चेन्नईने आतापर्यंत दोन सामने जिंकले, मात्र दिल्लीविरोधात सीएसके ढेर झाली. दिल्लीने २० धावांनी सामना जिंकूनही संघाच्या कर्णधाराला १२ लाखांचा दंड बसला आहे.

ऋषभ पंतने चेन्नईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. या सामन्यात पंतने ३२ चेंडूत ५१ धावांची खेळी खेळली. या डावात ४ चौकार आणि ३ षटकार लगावले. ऋषभ पंतच्या खेळाच्या जोरावर दिल्लीची धावसंख्या १९१ धावांपर्यंत पोहोचली.

दिल्लीने दिलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ आधीच ढेर झाला. दिल्लीने २० धावांनी सामना जिंकला. या सामन्यात दिल्लीने बाजी मारूनही एक चूक ऋषभ पंतला महागात पडली. सामना जिंकल्यानंतर ऋषभ पंतला संथ गतीने गोलंदाजी करण्याचा फटका बसला. त्यामुळे ऋषभला १२ लाखांचा दंड भरावा लागला. याआधी गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला देखील संथ गतीने गोलंदाजी करण्याचा फटका बसला होता. त्यालाही १२ लाखांचा दंड बसला. बीसीसीआयने ही कारवाई केली आहे.

सामना कसा झाला?

दिल्ली आणि चेन्नईदरम्यान रोमांचक सामना झाला. या सामन्यात चाहत्यांची स्फोटक खेळी पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. सामन्यात ऋषभ पंतने स्फोटक फलंदाजी करत चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. तर यावेळी धोनीचाही स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. धोनीने या सामन्यात १६ चेंडूत ३७ धावांची खेळी खेळली. या डावात धोनीने ४ चौकार आणि ३ षटकार लगावले. या सामन्यात धोनीची खेळी व्यर्थ ठरली. धोनीच्या आक्रमक खेळीनंतरही चेन्नईला संघाला २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT