IPL 2023, BCCI / Social Media
IPL 2023, BCCI / Social Media saam tv
क्रीडा | IPL

IPL 2023: आयपीएलचा यंदाचा सीजन वेगळाच असणार; नव्या नियमांमुळे सामन्यात कधीही ट्वीस्ट येणार, जाणून घ्या सविस्तर

प्रविण वाकचौरे, साम टिव्ही ब्युरो

IPL New Rules:  आयपीएलच्या नव्या सीजनची क्रिकेटप्रेमी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्येक सीजनमध्ये प्रेक्षकांचा एक वेगळा अनुभव असते. यंदाचा आयपीएलचा 16वा सीजन खऱ्या अर्थाने वेगळा असणार आहे. कारण अनेक नवीन नियमांचा समावेश या आयपीएलचा असणार आहे. कोणते नवीन नियम या आयपीएलमध्ये पाहायला मिळतील, याबद्दल जाणून घेऊया.

बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलमध्ये नियमांत महत्त्वाचा बदल केला आहे. यात इम्पॅक्ट प्लेअर या नियमामुळे सामन्याचं चित्र कधीही पालटताना दिसेल. कारण या नियमानुसार टॉसवेळी संघातील प्लेइंग इलेव्हनसह 4 पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतील. त्या 4 खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला कर्णधार सामन्यादरम्यान इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करु शकेल. प्लेईंग इलेव्हनमधील एका खेळाडूला हा खेळाडू रिप्लेस करेल. (Latest sports updates)

जो खेळाडू बदलला आहे तो खेळाडू मात्र पुन्हा सामन्यात खेळू शकणार नाही. रिटायर्ड हर्ट प्लेअरच्या जागी इम्पॅक्ट प्लेअरही फलंदाजीला येऊ शकतो. दोन्ही संघ प्रत्येक सामन्यात एक इम्पॅक्ट प्लेअर वापरू शकतात. जर संघात 4 परदेशी खेळाडू असतील, तर विदेशी खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार नाही.

दुसरा महत्त्वाच बदल DRS करण्यात आला आहे. प्रत्येक डावात दोन DRS असतील. वाईड आणि नो-बॉलवर खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकतील. महिला प्रीमियर लीग पहिल्यांदा याचा वापर झाला. मुंबई इंडियन्सची हरमनप्रीत कौर हा नवा नियम वापरणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: तुमच्या घरी ४० वर्षे राहिली, तरी तिला बाहेरची समजाल का? सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत अजित पवारांचा सवाल

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: ओमराजेंचा तानाजी सावंतांवर रुग्णवाहिका घाेटाळ्याचा आराेप, महायुतीकडून ओमराजेंना 'हे' सवाल, Video

Soyabean Benefits: सोयाबीन खा अन् धडधाकट राहा, आरोग्यदायी फायदे

IPL 2024: शिवम दुबेची अफलातून फलंदाजी; या बाबतीत दिग्गजांनाही सोडलं मागे

Hot Water Benefits: जेवण केल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT