MS dhoni  Saam TV
Sports

MS Dhoni Knee Injury News: धोनी पुढील सामन्यातून बाहेर? धोनीच्या दुखापतीबाबत हेड कोचने दिली महत्त्वाची माहिती

IPL News : धोनी घोट्याच्या दुखापतीमुळे पुढीस सामना खेळू शकणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

MS Dhoni Injured News : चेन्नई सुपर किंग्सला सर्वात मोठा झटक बसण्याची शक्यता आहे. कारण सीएसकेचा कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी पुढील सामना खेळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. धोनी घोट्याच्या दुखापतीमुळे पुढीस सामना खेळू शकणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा कोच स्टिफन फ्लेमिंग याने पत्रकार परिषदेत सांगितलं की, आयपीेएल सुरु होण्याआधीपासून धोनी घोट्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. धोनीची घोट्याची दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. अद्यापही धोनीला दुखापतीचा सामना करावा लागत आहे. मैदानात धोनीकडे पाहताना ते दिसून येत आहे. मात्र पुढचा सामना खेळणार की नाही खेळणार यावर फ्लेमिंगने कोणतंही भाष्य केलेलं नाही. (Sports News)

धोनीला दुखापतीमुळे संघातूत बाहेर बसावं लागल्यास सीएसकेला मोठा फटका बसू शकतो. कारण धोनी जबरदस्त फॉर्मात आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या कालच्या सामन्यात धोनीने 17 चेंडूत 32 धावा कुटल्या. धोनीने केलेल्या फटकेबाजीमुळे सीएसकेने कालचा सामना अवघ्या 3 सामन्यांनी गमावला. (IPL News)

सीएसकेचे हे खेळाडू दुखापतग्रस्त

चेन्नई संघाला दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या मोठी आहे. धोनीशिवाय दीपक चहर, सिमरजीत, बेन स्टोक्स आणि सिसांडा मगाला हे देखील दुखापतग्रस्त आहेत. तर जॅमिसन आणि मुकेश चौधरी दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ८,७०० रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; बड्या नेत्याच्या निधनाने राजकारणात हळहळ

Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर

Heart Blockage: लिंबू-आल्याचं पाणी प्यायल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांनी सांगितलं सर्जरीशिवाय कसे ठीक कराल ब्लॉकेज?

SCROLL FOR NEXT