SRH Saam TV
Sports

अर्ध्यावरती डाव सोडला...'या' संघाचा कर्णधारच परतला मायदेशात, कारण...

आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा संघाला आपला पुढील सामना नियोजित कर्णधाराशिवाय खेळावा लागणार आहे.

Nandkumar Joshi

IPL 2022 Kane Williamson : सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा कर्णधार केन विलियमसन आपल्या संघासाठी अखेरचा लीग सामनाही खेळू शकणार नाही. आयपीएल स्पर्धा (IPL)अर्धवट सोडून केन आपल्या मायदेशी परतला आहे. २२ मे रोजी सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्जसोबत होणार आहे. या दोन्ही संघांतील लढत या सत्रातील अखेरची असेल.

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सनरायझर्स हैदराबादचा संघाला आपला पुढील सामना नियोजित कर्णधाराशिवाय खेळावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केन विलियमसन हा दुसऱ्यांदा 'बाबा' होणार आहे. त्यामुळे तो मायदेशी परतला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाच्या व्यवस्थापनानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला होता. आता २२ मे रोजी हैदराबादची या फेरीतील अखेरची लढत पंजाबविरोधात होणार आहे. आयपीएलच्या या सत्रातील हा अखेरचा सामना असणार आहे.

विलियमसन हा अखेरच्या लढतीसाठी उपलब्ध नसेल, असे स्वतः सनरायझर्स हैदराबादच्या व्यवस्थापनानंच स्पष्ट केलं आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून त्यांनी ही माहिती दिली. आमच्या संघाचा कर्णधार केन विलियमसन मायदेशी जात आहे. त्याच्या कुटुंबात नवा सदस्य येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

प्ले ऑफचा मार्ग खडतर

१७ मे रोजी हैदराबादनं मुंबई इंडियन्सचा ३ धावांनी पराभव केला. या विजयासह संघानं फ्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. मात्र, हैदराबादचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग अद्यापही खडतर आहे. कारण रन रेटच्या बाबतीत हैदराबादचा संघ खूपच पिछाडीवर आहे. पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळाला तरी, संघाला प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर जावे लागणार आहे. विलियमसनच्या नेतृत्वात संघानं १३ सामन्यांत ६ विजय मिळवले. तर ७ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. १२ गुणांसह संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT