IPL 2022
IPL 2022 Saam TV
क्रीडा | IPL

IPL 2022: एकाच बॉलने लिहीली कोलकाताच्या विजयाची अन् मुंबईच्या परभवाची कथा

Pravin

क्रिकेटकडे अनिश्चीततेने भरलेला खेळ म्हणून पाहिले जाते. एका बॉलमध्ये सामन्याचे संपुर्ण चित्र बदलू शकते. याची प्रचिती कालच्या मुंबई विरुद्ध कोलकातच्या (KKR vs MI) सामन्यात आली. एका चेंडूने मुंबईच्या संघाल अडचणीत आणले. एकाच चेंडूने तीन फलंदाजांची विकेट उडवली. त्या एका बॉलने मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पराभवाची आणि कोलकाताच्या विजायाची स्क्रिप्ट लिहीली गेली. गोलंदाजाने फेकलेल्या त्या एका चेंडूने संपुर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकले. आता तुम्ही म्हणत असाल असे काय घडले की सामन्याचा निकाल फक्त एका बॉलने ठरवला. एका चेंडूत कशा तीन विकेट कशा पडू शकतात. तर इथे एक चेंडू म्हणजे एकाच व्हेरियशनमध्ये टाकलेला चेंडू समजावा.

एका चेंडूवर मुंबईच्या 3 विकेट...

आता पॅट कमिन्सची ते षटक आठवा. मुंबईच्या डावातील 15 वे षटक ज्याने खर्‍या अर्थाने सामन्याची दिशा बदलून टाकली. कमिन्सने या षटकात शॉर्ट बॉलचा वापर करून मुंबई इंडियन्सच्या 3 फलंदाजांची शिकार केली. ज्यामध्ये इशान किशनच्या मोठ्या विकेटचा समावेश होता. हेच षटक या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरले. कोलकाताला हा पराभव न परवडणार नव्हता. कारण त्यांना अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. मुंबईच्या संघ यापुर्वी स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

कमिसच्या 'शॉर्ट बॉल'ने मुंबईच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली

त्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सने इशान किशनची विकेट घेतली. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचा हा चेंडू बाउन्सर होता, त्यावर इशानचा झेल रिंकू सिंगने टिपला. यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर काही घडले नाही. पण चौथ्या चेंडूवर कमिन्सने पुन्हा शॉर्ट बॉल टाकला. 141 किमी प्रतितास वेगाने पडलेल्या त्या चेंडूवर डॅनियल सॅम्सला चकवा दिला आणि यष्टीरक्षकाने त्याचा झेल घेतला. यानंतर कमिन्सच्या षटकातील शेवटचा चेंडूही शॉर्ट होता, त्यावर मुरुगन अश्विन शिकार ठरला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

SCROLL FOR NEXT