IPL 2022 Twitter/ @IPL
Sports

IPL 2022: जेवढ्याला विकले जातात त्यातले खेळाडूला किती पैसे मिळतात?

आयपीएल २०२२ (IPL 2022) चा लिलाव सुरु आहे. पहिल्या दिवशी ७४ खेळाडूंना फँचायझींनी आपल्या संघात घेतेले.

वृत्तसंस्था

आयपीएल २०२२ (IPL 2022) चा लिलाव सुरु आहे. पहिल्या दिवशी ७४ खेळाडूंना फँचायझींनी आपल्या संघात घेतेले. लिलावाच्या पहिल्याच दिवशी १० खेळाडूंवरती १० कोटीच्या वरती बोली लागली आहे. इशान किशन १५.२५ कोटी रुपयांत मुंबई इंडिसन्सने (Mumbai Indians) आपल्या संघात घेतले आहे. तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तसेच अनकॉप खेळाडूंपैकी आवेश खानवर १० कोटी रुपयांची बोली लावली. तसेच परदेशातील खेळाडूंपैकी १०.७५ कोटी रुपयांत निकोलस पुरण सर्वात महागडा खेळाडू ठरला. असे अनेक खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची बोली लावली आहे.

परंतु तुम्हाला माहित आहे का की खेळाडू जेवढ्या पैशांना विकत घेतला जातो, तेवढे पैसे त्याला मिळतात का? लिलावात दिल्या जाणाऱ्या पैशातून काही पैसे कापले जातात आणि मग ठराविक रक्कम खेळाडूला मिळते. खेळाडूंना मिळणाऱ्या पैशातून किती रक्कम कापली जाते? किती टॅक्स लागतो हे आपण जाणून घेवूयात..

किती पैसे कापले जातात?

लिलावात एखाद्या भारतीय खेळाडूला जेवढे पैसे मिळतात त्यातून टीडीएसचा चार्ज कापला जातो. भारतीय खेळाडूंना जेवढे पैसे मिळतात त्यातून १० टक्के टीडीएस कापला जातो. बरं इथंच थांबतं का?...तर नाही...त्यानंतर आईटीआर फाईल करावी लागते. त्यात खेळाडूचं उत्पन्न आणि खर्च सर्व लिहिलेलं असते. त्यानंतर कमाईवरती टॅक्स लावला जातो. आणि शेवटी नेट कमाई असते त्यावरही टॅक्स द्यावा लागतो. टीडीएस हा फक्त आयपीएलच्या लिलावात मिळणाऱ्या पैशांवर लावला जातो.

CA सौरभ शर्माने सांगितले की खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेवरचा टॅक्स कापल्यानंतर त्यांना किती रक्कम मिळते हे निश्चीत सांगता येणार नाही. दरम्यान लिलावात एक बेस प्राईस असते. त्यानंतर खेळाडूला कंपनीसोबत अनेक करार करावे लागलता. त्या कराराच्या आधारावर खेळाडूला रक्कम मिळते. आणि त्या रकमेवर कर आकारला जातो. महत्त्वाचं म्हणजे लिलावात जेवढी रक्कम मिळते त्यावर १० टक्के टीडीएस लावला जातो.

परदेशी खेळाडूंना किती कर भरावा लागतो?

परदेशी खेळाडूंना भारतात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या २० टक्के टीडीएस भरावा लागतो. त्याचबरोबर परदेशी खेळाडूंना TDS व्यतिरिक्त कोणताही कर भरावा लागत नाही. जर त्यांनी भारतात इतर कोणतेही उत्पन्न मिळवले नसेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. त्यांना फक्त भारतात मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. तसेच त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की या खेळाडूंना वेगवेगळ्या मार्गाने पैसेही मिळतात. यामध्ये एखाद्या खेळाडूचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नसेल तर त्यांना वेगळे पैसे मिळतात.

अशा परिस्थितीत खेळाडूंसोबत केलेल्या कराराच्या आधारे संपूर्ण कपातीची माहिती मिळू शकते, असे म्हणता येईल. त्याच वेळी, जर एखादा खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी उपलब्ध नसेल, तर त्याची फी वजा करून दिली जाते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab: शिवालीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

उंच पाळणा बंद पडला, 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला, पाहा थरारक व्हिडिओ

Dhule : अतिक्रमण कारवाईत पोलिसांकडून मारहाण; भाजी विक्रेत्यांचा आरोप, संतप्त विक्रेत्यांनी केला रास्ता रोको

Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीवरून राजकारण पेटलं; राजू शेट्टींचं जुनं पत्र व्हायरल, पत्रात नेमकं काय लिहिलं?

Nashik News : ईडीचा माजी आयुक्ताला दणका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका कृत्याने संशय बळावला

SCROLL FOR NEXT