IND Vs ENG Test Live Saam Digital
Sports

IND Vs ENG Test Live: राजकोटवर 'यशस्वी'चं वादळ, इंग्लडविरुद्ध ठोकलं दुसरं द्विशतक

IND Vs ENG Test Live: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी देखील भारतीय फलंदाजांचा झंझावात सुरूच असून यसस्वी जैस्वालने भीम पराक्रम केला आहे. अवघ्या २३ व्या वर्षी त्याने इंग्लंडविरुद्ध दोन सेंच्युरी ठोकत क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Sandeep Gawade

IND Vs ENG Test Live

भारत आणि इंग्लंड यांच्यातील राजकोट कसोटीचा आज चौथा दिवस आहे. सध्या या सामन्यात टीम इंडिया फ्रंटफूटवर आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी देखील भारतीय फलंदाजांचा झंझावात सुरूच असून यसस्वी जस्वालने भीम पराक्रम केला आहे. अवघ्या २३ व्या वर्षी डब्बल सेंच्युरी ठोकत त्यांने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. सलामीवीर यशस्वी जैस्वालने तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केलं तर चौथ्या दिवशी द्विशतकाला गवसणी घातली. इंग्लड विरुद्ध दोन डबल सेंच्यूरी ठोकणार यशस्वी पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

तिसऱ्या दिवस अखेर भारतीय संघाने ३२२ धावांची मजबूत आघाडी घेतली होती. त्यात यशस्वीने द्विशतकाची भर घातली तर सर्फराज खान आणि शुभमन गिल यांच्या अर्धशतकी खेळीची साध मिळाली. यशस्वी जैस्वालने १० षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने २०० धावांचा आकडा पार केला. दुसऱ्या डावात भारताने ४ बात ४१२ धावा केल्या असून ५३८ धावांची मोठी आघाडी घेतली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिसऱ्या दिवस अखेर भारताने ५१ षटकात २ बाद १९६ धावा करून ३२२ धावांची आघाडी घेतली होती. रोहीत शर्मा अवघ्या १९ धावांवर बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी धुरा सांभाळली होती. चौथ्या दिवशी शुभमन गिल आपले शतक पूर्ण करेल अशी उपेक्षा होती, मात्र तो ९१ धावांनर धावबाद झाला. यशस्वीने मात्र झंझावात कायम ठेवला आणि द्विशतक पूर्ण केलं. सर्फराजनेही चांगली साथ देत ६८ धावा केल्या.

भारताचा दुसरा डाव

भारताने 4 बाद 430 धावा करून दुसरा डाव घोषित केला. भारताने इंग्लंडसमोर 557 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 319 धावांवर ऑल आउट झाला होता. टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी होती. अशारितीने भारताने 556 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्याडावात यशस्वी जयस्वालने 214 धावा केल्या. सर्फराजने 68 धावांची खेळी केली. दोघांमध्ये 158 चेंडूत 172 धावांची भागीदारी झाली. त्याआधी शुभमन गिल 91, कुलदीप यादव 27, रोहित शर्माने 19 धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT