ind vs eng yandex
Sports

India vs England Test Series: ठरलं! 5 कसोटींसाठी टीम इंडिया इंग्लंडचा दौरा करणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

India vs England Test Series Full Schedule: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. दरम्यान या मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

Ankush Dhavre

IND vs ENG Test Series Schedule: भारतीय संघाला येत्या काही दिवसात अनेक महत्वाच्या मालिका खेळायच्या आहे. या वर्षाच्या शेवटी बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेचा थरार रंगणार आहे. दरम्यान बीसीसीआयने पुढच्या वर्षी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

ही मालिका २०२३-२५ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संपल्यानंतर सुरु होणार आहे. नुकताच इंग्लंडने पुरुष आणि महिला संघाचं २०२५ वर्षासाठीचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा देखील समावेश असणार आहे.

इंग्लंडचा दौरा हा प्रत्येक संघासाठी कठीण मानला जातो. मात्र भारतीय संघाने इंग्लंडमध्ये जाऊनही शानदार कामगिरी करुन दाखवली आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना २० जून ते २४ जून २०२५ दरम्यान रंगणार आहे. भारतीय पुरुषांचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना महिला संघ देखील इंग्लंडच्या महिला संघाला आव्हान देताना दिसून येणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.

असं असेल वेळपत्रक

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका ४ ऑगस्टपर्यंत सुरु राहिल. तर महिलांच्या टी-२० मालिकेला २८ जूनपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना २२ जुलै रोजी खेळला जाणार आहे.

टी-२० मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा देखील थरार रंगणार आहे. या मालिकेला १६ जुलैपासून सुरुवात होणार असून शेवटचा वनडे सामना २२ जुलै रोजी खेळला जाणार आहे.

पाहा संपूर्ण वेळापत्रक

या मालिकेतील पहिला कसोटी सामना २० जून ते २४ जून दरम्यान हेडिंग्लेमध्ये खेळला जाणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना २ जुलै ते ६ जुलै दरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना एजबस्टनच्या मैदानावर रंगणार आहे. तर तिसरा कसोटी सामना, १० ते १४ जुलै, चौथा कसोटी सामना २३ ते २७ आणि मालिकेतील शेवटचा सामना ३१ ते ४ ऑगस्टपर्यंत रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

SCROLL FOR NEXT