Most Runs Against West Indies saam tv
Sports

Most Runs Against West Indies: रोहित, विराट नव्हे तर 'हे' आहेत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे टॉप 3 फलंदाज

Highest Run Scorers Against WI In Test: जाणून घ्या कोण आहेत, वेस्ट इंडिज संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ३ फलंदाज.

Ankush Dhavre

IND vs WI Test Series: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव विसरून भारतीय संघ आता नव्याने सुरुवात करणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज संघासोबत दोन हात करण्यसाठी सज्ज झाला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये १२ जुलैपासून २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतून अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला विश्रांती दिली गेली आहे. तर यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाडसारखे युवा खेळाडू भारतीय संघाकडून खेळताना दिसुन येणार आहे.

दरम्यान ही मालिका सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या कोण आहेत, वेस्ट इंडिज संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ३ फलंदाज.

सुनील गावसकर:

सुनील गावसकर त्यावेळी भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करायचे ज्यावेळी रॉबर्ट्स, होल्डिंग, क्रॉफ्ट आणि गार्ननर सारखे गोलंदाज वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व करायचे. त्यावेळी सुनील गावसकर हेल्मेट न घालता या गोलंदाजांचा सामना करायचे.

त्यांनी वेस्ट इंडिज संघाविरूद्ध खेळताना २७ सामन्यांमध्ये २७४९ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून वेस्ट इंडिज संघाविरूद्ध खेळताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ते अव्वल स्थानी आहेत.

इतकेच नव्हे तर त्यांनी वेस्ट इंडिज संघाविरूद्ध खेळताना १३ शतके आणि ७ अर्धशतके देखील झळकावली आहेत. तर नाबाद २३६ धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे.

राहुल द्रविड:

भारतीय संघाचा द वॉल म्हणुन ओळखला जाणारा राहुल द्रविड सध्या भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भुमिका पार पाडतोय. आपल्या भरभक्कम डिफेन्सने गोलंदाजांना रडवणाऱ्या राहुल द्रविडने वेस्ट इंडिजविरूद्ध खेळताना धावांचा पाऊस पाडला आहे.

त्याने वेस्ट इंडिज संघाविरूद्ध खेळलेल्या २३ सामन्यांमध्ये १९७८ धावा केल्या आहेत. तर २००६ मध्ये केलेली १४६ धावांची खेळी त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. (Latest sports updates)

व्हीव्हीएस लक्ष्मण:

व्हीव्हीएस लक्ष्मण हा भारतीय क्रिकेटमधील विश्वासु खेळाडूंपैकी एक आहे. जेव्हा जेव्हा भारतीय संघाला गरज असायची त्यावेळी हा फलंदाज टिचून फलंदाजी करायचा. वेस्ट इंडीज विरूद्ध खेळताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हा फलंदाज तिसऱ्या क्रंमाकावर आहे. त्याने २२ सामन्यांमध्ये ५७.१६ च्या सरासरीने १७१५ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तर १७६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

SCROLL FOR NEXT