Champions Trophy 
Sports

Champions Trophy: भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास! चीनचा 1-0 असा पराभव करून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

Champions Trophy: बिहारमधील राजगीर येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय महिला संघाने तिरंगा फडकावला आणि चीनचा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिहारमधील राजगीर येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय महिला संघाने तिरंगा फडकावला आणि चीनचा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. भारताने अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव केला. भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत बहुतांश वेळा चेंडू आपल्या नियंत्रणात ठेवला तर दुसरीकडे चीनच्या खेळाडूंना सामन्यात एकही गोल करता आला नाही. भारतासाठी सामन्यातील एकमेव गोल दीपिकाने केला आणि तिच्या गोलच्या जोरावर भारताला विजेतेपद मिळवण्यात यश आले.

सलीमा टेटे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये वर्चस्व गाजवले आणि संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. भारताने उपांत्य फेरीत जपानचा पराभव केला होता. भारताने तिसऱ्यांदा (2016, 2023, 2024) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. यासह भारताने दक्षिण कोरियाची बरोबरी केली आहे. दक्षिण कोरियाने ACT चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही तीन वेळा जिंकले.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये भारताने पाच सामने खेळले आणि ते सर्व जिंकले. म्हणजे एकही सामना न गमावता चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावण्यात संघाला यश आले आहे. चीनच्या संघाने पाच सामने खेळले, त्यापैकी फक्त एकच पराभव झाला आणि तोही अंतिम फेरीत. अंतिम फेरीत भारतासमोर चीनचे खेळाडू विशेष काही दाखवू शकले नाहीत.

23व्या मिनिटाला चीनला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र गोल होऊ शकला नाही. ब्रेकच्या तीन मिनिटे आधी भारताला खाते उघडण्याची संधी होती पण लालरेमसियामीच्या पासवरून शर्मिलाचा फटका बारला लागला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत जपानने मलेशियाचा ४-१ ने पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवांची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

SCROLL FOR NEXT