indian women cricket team  saam tv
Sports

CWG 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का; आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आणखी एका खेळाडूला कोरोना (Corona) विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे ती खेळाडू बर्मिंघम येथे रवाना झाली नाही. मात्र, भारतीय संघ हा रविवारी २४ जुलै रोजी बंगळूर येथून बर्मिंघमला रवाना झाला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ सुरु होण्याआधीच भारतीय महिला क्रिकेट संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आणखी एका खेळाडूला कोरोना (Corona) विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे त्या खेळाडूला बर्मिंघम येथे जाता आले नाही. मात्र, भारतीय संघ हा रविवारी २४ जुलै रोजी बंगळूर येथून बर्मिंघमला रवाना झाला आहे. ( Indian Women Cricket Team News )

भारतीय महिला क्रिकेट संघातील कोरोनाची लागण झालेल्या दोन्ही खेळाडूंची नावे अद्याप समोर आले नाहीत. दोन्ही खेळाडू हे राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG) पहिला सामना खेळू शकणार नाहीत. राष्ट्रकुल स्पर्धेत यावेळी पहिल्यांदा महिला क्रिकेटचा सामावेश करण्यात आला आहे. त्यामुळे २४ वर्षांनी राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट सामावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत क्रिकेटचा टी२० फॉरमॅट खेळण्यात येईल. 'ग्रुप बी'मध्ये भारताचा पहिला सामना २९ जुलै रोजी विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघ (IOA)चे अधिकारी पीटीआय वृत्त संस्थेला याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'भारतीय महिला क्रिकेट संघाच्या दुसऱ्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे . या खेळाडूला बर्मिंघमला रवाना होण्याआधी कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ते दोन्ही खेळाडू भारतातच थांबले आहे. हे दोन्ही खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यावर हे संघात पुन्हा सामील होऊ शकतात.

दरम्यान, हे दोन्ही खेळाडू कोरोनातून पूर्णपणे झाल्यावर पाकिस्तानच्या विरोधात ३१ जुलै रोजी होणाऱ्या सामना खेळण्याची शक्यता आहे. भारताला ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया,पाकिस्तान व्यतिरिक्त बारबडोसच्या विरोधात सुद्धा एक सामना खेळावा लागणार आहे. इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, न्यूजीलँड आणि श्रीलंका हे संघ देखील या स्पर्धेचा भाग असणार आहेत. अंतिम सामन्यासहित सर्व सामने हे बर्मिंघमच्या प्रसिद्ध एजबेस्टन मैदानात खेळण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT