BCCI News in Marathi, Latest cricket News Marathi, IPL 2022 News,  Saam TV
Sports

BCCI चा मोठा निर्णय! आफ्रिकेसोबत खेळायचंय फिटनेस टेस्ट गरजेची

सध्या आयपीएलचा रणसंग्राम अंतीम टप्प्यात येऊन ठेपलाय. गुजरातचा संघ अंतीम सामन्यासाठी पात्र ठरलाय.

Pravin

सध्या आयपीएलचा रणसंग्राम अंतीम टप्प्यात येऊन ठेपलाय. गुजरातचा संघ अंतीम सामन्यासाठी पात्र ठरलाय. आता प्रतिक्षा दुसऱ्या संघाची आहे. परंतु आयपीएल संपल्यानंतर लगेचंच भारतीय संघाला आफ्रिकेविरुद्ध टी-20 (IND vs SA) मालिका खेळायची आहे. त्यासाठी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये 2022 (IPL 2022) खेळलेल्या खेळाडूंनी आणि आफ्रिकेविरुद्ध संघात स्थान मिळालेल्यांनी आपली फिटनेस टेस्ट द्यायची आहे. बीसीसीआयने केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाला 5 जून रोजी NCA मध्ये फिटनेस टेस्टसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. (Latest Cricket News Marathi)

''दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी सर्व खेळाडूंनी एनसीएमध्ये हजर राहायचे आहे. हे महत्त्वाचे आहे कारण काही खेळाडूंच्या फिटनेसवरती प्रश्नचिन्ह आहे. हर्षल पटेलला अजून टाके आहेत त्यामुळे तो ठिक आहे की नाही हे ठरवावे लागणार आहे.'' असे बीसीसीआयने म्हटले आहे.

18 सदस्यीय भारतीय संघ आयपीएल 2022 संपल्यानंतर 5 जून किंवा त्यापूर्वी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये एकत्र येईल. एनसीएचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवतील आणि सर्व खेळाडूंची फिटनेस टेस्ट करुन घेतील. बेंगळुरुवरुन सर्व 9 जून रोजी होणाऱ्या पहिल्या टी-20 साठी 7 जून रोजी दिल्लीला जातील. राहुल द्रविड या संघासोबत असणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kantara Chapter 1: 'हा चित्रपट आणि पात्र...'; ऋषभ शेट्टीने सांगितलं 'या' कारणामुळे 'कांतारा' ब्लॉकबस्टर होऊ शकला

वर्गात कुणी नव्हतं, महिलेसोबत 'नको त्या अवस्थेत' शिक्षकाला पकडलं, विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शूट करून केला व्हायरल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! कधीपर्यंत लागू होणार? वाचा सविस्तर

Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

SCROLL FOR NEXT