Asian Games 2023 Saam TV
Sports

Asian Games 2023 : भारतीय नेमबाजांची कमाल; 10 मीटर एयर पिस्टलमध्ये पटकावलं सुवर्णपदक

Asian Games 2023 live updates : भारतीय नेमबाज सरबज्योत सिंग, शिवा नरवाल आणि अर्जुन सिंग चीमा यांनी सांघिक सुवर्णपदक जिंकलं आहे.

प्रविण वाकचौरे

Asian Games 2023 :

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी शानदार सुरुवात केली आहे. भारतीय वुशू खेळाडू रोशिबिना देवी हिने रौप्य पदक जिंकले. त्याचबरोबर यानंतर नेमबाजीत भारताला सुवर्णपदक मिळाले आहे.

भारतीय नेमबाज सरबज्योत सिंग, शिवा नरवाल आणि अर्जुन सिंग चीमा यांनी पुरुषांच्या सांघिक १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. भारताचे हे आजचे दुसरे पदक आहे.

भारताला पाचव्या दिवशी पहिले पदक रौप्यपदक मिळाले. वुशू खेळाडू रोशिबिना देवीने रौप्यपदक जिंकण्याची कामगिरी केली. रोशिबिना ६० किलो अंतिम चीनच्या डब्ल्यूयू झियाओवेईकडून पराभूत झाली. अंतिम फेरीत तिचा 2-0 असा पराभव झाला. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. (Latest Marathi News)

त्यांतर नेमबाजी संघाने देशासाठी दिवसातील दुसरे पदक जिंकले. सरबज्योत सिंग, अर्जुन चीमा आणि शिवा नरवाल यांनी पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल संघात सुवर्णपदक जिंकले. (Latest Sport News)

नेमबाजांची कामगिरी

याआधी बुधवारी सिफ्ट कौर समरा, मानिनी कौशिक आणि आशी चोक्सी यांनी ५० मीटर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. यानंतर 25 मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेत मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांच्या संघाने भारताला सुवर्णपदक जिंकले होते. तसेच भारताच्या सिफ्ट कौरने ५० मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

टिटवाळ्यात पाणीटंचाईचा कहर! पाणी आणायला गेलेल्या 3 चिमुकल्यांना भरधाव कारची धडक

SCROLL FOR NEXT