champions trophy instagram
Sports

Champions Trophy: आता तर हद्दच पार केली..पाकिस्तानात पुन्हा एकदा भारतीय झेंड्याचा अपमान; VIDEO पाहून राग अनावर होईल

Indian Flag In Pakistan: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार पाकिस्तानात सुरु आहे. दरम्यान पाकिस्तानात पुन्हा एकदा भारतीय तिरंग्याचा अपमान झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

पाकिस्तान काही सुधरण्याचं नाव घेत नाहीये. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत.

काही दिवसांपूर्वी कराचीत चॅम्पियन्स ट्रॉफीचा ओपनिंग सोहळ पार पडला. यादरम्यान सर्व ७ देशांचे झेंडे लावण्यात आले होते. मात्र भारताचा झेंडा लावला गेला नव्हता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

पाकिस्तानात पुन्हा भारतीय तिरंग्याचा अपमान?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ कराचीचा असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यात एक व्यक्ती सर्व देशांचे झेंडे लावताना दिसून येत आहे. मात्र भारताचा झेंडा त्याने उलटा लावला आहे. तुम्ही जर पाहिलं तर, उर्वरित ७ देशांचे झेंडे व्यवस्थित लावले आहेत, पण भारताचा झेंडा त्याने मुद्दाम उलटा लावला आहे. हे पाहून भारतीय फॅन्स संतापले आहेत.

स्टेडियममध्ये झेंडा न लावण्यावरून झाला होता वाद..

यापूर्वी जेव्हा ओपनिंग सोहळा पार पडला, त्यावेळी भारताचा सोडून इतर ७ संघाच्या देशाचे झेंडे लावले गेले होते. याबाबत बोलताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डने स्पष्टीकरण दिले होते. त्यांचे म्हणणे होते की, आयसीसीने असा सल्ला दिलाय की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत केवळ ४ झेंडे असतील. एक आयसीसीचा, एक यजमान देशाचा आणि २ झेंडे जे देश सामना खेळत आहेत त्यांचे असतील. मात्र ओपनिंग सोहळ्यावेळी ४ पेक्षा अधिक झेंडे होते. त्यात भारतीय तिरंग्याच्या समावेश नव्हता.

आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. तर भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सामना दुबईत खेळवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्टपर्यंत नियोजन

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

Genelia Deshmukh Photos: 'माझ्या हृदयाचा ठोका...!' जेनेलियाचे फोटो पाहून रितेश देशमुख झाला 'प्रेमात वेडा', म्हणाला....

SCROLL FOR NEXT