Rishabh Pant captain For India vs South Africa T-20 series
Rishabh Pant captain For India vs South Africa T-20 series saam tv
क्रीडा | IPL

Rishabh Pant Accident: 'या' खास व्यक्तीला रिषभ पंत देणार होता सरप्राईज, मात्र रस्त्यातच झाला भीषण अपघात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rishabh Pant Accident: भारताचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंतच्या भीषण अपघाताच्या बातमीने क्रिडाविश्वात एकच खळबळ माजली आहे. दिल्लीहून हम्मदपूरकडे परतत असताना हा अपघात झाला. यावेळी ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. या भीषण अपघातामध्ये ऋषभ पंत याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी रिषभ पंत एका खास कारणासाठी गाडीने जात असल्याची माहितीही समोर आली आहे. (Road Accident)

याबाबत अधिक माहिती अशी की, क्रिकेटपटू रिषभ पंतचा (Rishabh Pant) भीषण अपघात झाला असून त्याच्यावर डेहराडूनमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिषभ पंतने नववर्षाच्या स्वागतासाठी खास योजना आखली होती, यासाठी त्याने आईला अचानक भेटून सरप्राईज देण्याचे ठरवले होते. त्यासाठी तो कसलीही कल्पना देता आईकडे चालला होता, मात्र रस्त्यामध्ये त्याला डोळा लागल्याने गाडीचा भीषण अपघात घडला.

नवे वर्ष आपल्या कुटूंबासोबत साजरा करण्याचा प्लॅन रिषभ पंतने केला होता, मात्र त्याआधीच त्याचा भीषण अपघात घडला. अपघाताची तिव्रता इतकी होती की गाडीने जागीच पेट घेतला. प्रसंगावधान दाखवत गाडीची काच फोडून रिषभ गाडीबाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान या अपघातात पंतच्या डोक्याला तसेच पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील गुलटेकडी परिसरात वाहनांची तोडफोड

Devendra Fadnavis: भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट का कापले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

Maharashtra Politics 2024 : 'त्यांच्या ४८ नाही तर ४९ जागा येतील'; उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा खोचक टोला

Budh Gochar 2024: मे महिन्यात बुध ग्रहाचं परत एकदा परिवर्तन; ५ राशींच्या जीवनात होणार मोठी घडामोड

Pune CCTV: मास्क लावून आले, धाक दाखवला, सोन्याचं दुकान लुटलं! ते 7 दरोडेखोर नेमके कोण?

SCROLL FOR NEXT