indian cricketers virat kohli and rohit sharma celebrated ganesh chaturthi at their home photos went viral  Saam tv news
Sports

Ganesh Chaturthi: रोहित- विराट बाप्पाच्या भक्तीत लीन ;खास फोटो केले शेअर

Virat Kohli -Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli and Rohit Sharma Ganesh Chaturthi:

सध्या भारतात गणेशोस्तव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. अशातच भारताचा माजी कर्णधार किंग आणि अनुष्का शर्माच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. क्रिकेट आणि अभिनयातून वेळ काढून दोघेही बाप्पाच्या भक्तीत लीन झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

अनुष्का शर्माने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तिने गणपती बाप्पाच्या मूर्तीचा फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का पोज देताना दिसून येत आहेत. तर तिसऱ्या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का बाप्पांची आरती करताना दिसून येत आहेत. या दोघांनी लक्ष वेधून घेणारा पेहराव केला आहे.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराटने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. तर अनुष्का शर्माने केशरी रंगाची साडी नेसली आहे. या दोघांच्या ट्रेडिशनल लुकवर नेटकरी देखील भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. (Latest sports updates)

रोहितच्या घरी बाप्पाचे आगमन..

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील बाप्पाच्या भक्तीत लीन झाला आहे. त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर बाप्पाची आरती करत असतानाचा फोटो शेअर केला आहे. त्याने या फोटोला गणपती बाप्पा मोरया असं कॅप्शन दिलं आहे.

दमदार फॉर्ममध्ये विराट..

विराट कोहलीने २०२३ भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याने ५ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहेत. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने नाबाद १२२ धावांची तुफानी खेळी केली होती.

भारतीय संघ वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ हात करताना दिसून येणार आहे. हे दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत.

(साम टिव्हीचं Whatsapp चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र सुरुवातीच्या २ सामन्यांसाठी विराट उपलब्ध नसणार आहे. या दोन्ही सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तर २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात तो कमबॅक करताना दिसून येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT