K l rahul in press conference  saam tv
क्रीडा

Virat Kohli-KL Rahul : आता विराट कोहली करणार ओपनिंग? के एल राहुलने मजेशीर उत्तर दिलं की....

सामना झाल्यानंतर के एल राहुलला कोहलीच्या ओपनिंगबद्दल विचारण्यात आलं, कारण...

नरेश शेंडे

दुबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात गुरुवारी आशिया कप २०२२ चा रंगतदार सामना झाला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दोन वर्षानंतर शतकी खेळी करत १२२ धावा कुटल्या. कोहलीचा हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला शतक आहे. विराटने के एल राहुलसोबत (K L Rahul) सलामीला येत मैदानात चौफेर फटकेबाजी केली.

सामना झाल्यानंतर के एल राहुलला कोहलीच्या ओपनिंग बद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी राहुलने मजेशीर उत्तर दिलं. आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) मध्ये विराट कोहलीने अफगाणिस्तान विरुद्ध चमकदार कामगिरी केली. दरम्यान, टीम इंडियाचं आशिया कपमधील आव्हान संपुष्टात आलं असून आता टी-२० विश्वचषकावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अशातच विराट कोहलीच्या ओपनिंगबाबत क्रिकेटविश्वात चर्चा रंगू लागल्या आहेत. (K l rahul talks about virat kohli opining batting in press conference)

रोहित शर्माने अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात विश्रांती घेतली होती. त्यामुळे के एल राहुलसोबत विराट कोहली सलामीसाठी मैदानात उतरला होता. विराटने धडाकेबाज शतक ठोकल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर के एल राहुलला विराट कोहलीच्या ओपनिंगबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. आगामी होणाऱ्या मालिका आणि विश्वचषकामध्ये विराट कोहलीली ओपनिंग करायला पाहिजे का? या प्रश्नावर राहुलने मजेशीर उत्तर दिलं.

के एल राहुल म्हणाला, विराट ओपनिंगला आला तर मी बाहेर बसू का? त्यानंतर पत्रकार परिषदेत असलेले सर्व पत्रकारांनाही हसू आलं. विराट कोहलीचं धावा करण्यात सातत्य असणं टीम इंडियासाठी महत्वाचं आहे. विराटने ज्या प्रकारे अफगाणिस्तान विरोधात आक्रमक खेळी केली, ते खूपच छान होतं. आमच्या एका खेळाडूचा आत्मविश्वास पुन्हा वाढला आहे, हे संघासाठी खूप चांगलं संकेत आहे. विराट कोहली सलामीला आल्यावरच शतक ठोकणार असं नाही, तो ३ नंबरला खेळला तरीही अप्रतिम खेळी करू शकतो.

दरम्यान, कोहलीने आयपीएलमध्ये अनेक सामन्यांमध्ये ओपनिंग केली आहे. परंतु, भारतासाठी कोहली ३ नंबरवर खेळतो. कारण रोहित शर्मासोबत राहुल सलामी फलंदाज म्हणून खेळतो. विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात नऊ वेळा ओपनिंग केली आहे. या इनिंग्समध्ये विराटने ४०० धावा केल्या आहेत. विराट कोहलीने सलीमीवीर फलंदाज म्हणून एक शतक आणि दोन अर्धशतक ठोकलं आहेत. विराटने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये अफगाणिस्तान विरुद्ध पहिलं शतक केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विजयाचा साताऱ्यात जल्लोष, पाहा व्हिडीओ

Karisma Kapoor : 'वो मत डालना...' चुलत भावाच्या रोक्याला पोझ देताना करिश्मा कपूरचा पाय घसरला अन् पडता पडता वाचली, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

Tejaswini Pandit: महाराष्ट्र हरलास तू ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी पोस्ट, म्हणाली...

Dharmarao Baba Atram: शरद पवारांचं राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान

SCROLL FOR NEXT