Indian cricket team fans saam tv
Sports

T20 World Cup: भारत वर्ल्डकपमधून बाहेर, सोशल मीडियावर टीम इंडिया ट्रोल, खेळाडूंवर चाहते भडकले

भारतीय चाहत्यांमध्ये टीम इंडियाबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.

नरेश शेंडे

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा अॅडलेडच्या मैदानात आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनलचा महामुकाबला रंगला. वर्ल्डकप सुरु झाल्यापासून भारतानं ग्रुप स्टेजमध्ये आठ गुण प्राप्त करून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. परंतु, आजच्या सामन्यात (India vs England) इंग्लंडने भारतावर दणदणीत विजय मिळवला.

इंग्लंडने 10 विकेट्स राखून सोळा षटकातचं 170 धावा करून भारताचा दारुण पराभव केला. सेमीफायनलसारख्या अंत्यंत महत्वाच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला बाद करता आलं नाही. त्यामुळं भारतीय चाहत्यांमध्ये टीम इंडियाबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत. (Fans troll indian cricket team on social media)

चाहत्यांनी टीम इंडियाला केलं ट्रोल

टीम इंडिया वर्ल्डकपमधून (T20 World Cup) बाहेर झाल्याने चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.सोशल मीडियावर टीम इंडियाला ट्रोल केलं जात आहे. चाहत्यांनी भारतीय संघाच्या कमकुवत बाबींकडे लक्ष वेधलं आहे. काही चाहत्यांनी म्हटलं, युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) सामन्यात खेळवायला पाहिजे होता. मागील वर्ल्डकपमध्येही चहलला खेळवला नाही. तर काहींनी के एल राहुलला टीम इंडियातून बाहेर काढण्याची मागणी केली.

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 वर्ल्डकपचा सेमीफायनलचा महामुकाबला अॅडलेडच्या मैदानात रंगला. भारतानं इंग्लंडला 169 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर कर्णधार जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्सनं भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या सलामी जोडीनं नाबाद अर्धशतकी खेळी करून भारतावर एकतर्फी विजय मिळवला. जॉस बटलरने 49 चेंडूत 80 तर अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत 86 धावा कुटल्या. दोघांच्या दमदार नाबाद खेळीमुळं भारताचा दारुण पराभव झाला. इंग्लंडने 16 षटकात 170 धावांची खेळी साकारून भारताचा पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT