Indian Cricket Team In Parth saam Tv
Sports

T20 World Cup : वर्ल्डकपसाठी खेळाडू सज्ज, टीम इंडियाचा नवा प्लान माहितेय का? पूर्ण शेड्युल वाचा सविस्तर

वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताचे खेळाडू नव्या जोशात पर्थच्या मैदानात उतरले आहेत.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : लाखो क्रिकेटप्रेमींची टी-२० वर्ल्डकपची उत्सुकता शिगेला पोचली आहे. दोन आठवड्यानंतर ऑस्ट्रेलियात क्रिकेटच्या मैदानात वर्ल्डकपची (T-20 World Cup) रणधुमाळी सुरू होणार आहे. टीम इंडियाचे हुकमी खेळाडू रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमरहाला दुखापतीमुळं वर्ल्डकपला मुकावं लागलं आहे. टीम इंडियाला (Team India) हा मोठा धक्का बसला असतानाच आता पुन्हा एकदा भारताचे खेळाडू नव्या जोशात पर्थच्या मैदानात उतरले आहेत.

भारताचा पहिली लढत २३ ऑक्टोबरला पाकिस्तानच्या विरोधात होणार आहे. परंतु, पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारताच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये ट्रेनिंग सेशन सुरू केलं आहे. याबाबतची माहिती खुद्द बीसीसीआयने दिली आहे. (Indian Cricket Team latest News Update)

भारतीय क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर एक फोटो शेअर करत म्हटलंय की, हॅलो पर्थच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन (WACA)मध्ये स्वागत आहे. टीम इंडिया पहिल्या ट्रेनिंग सेशनसाठी पर्थमध्ये (WACA) पोहोचली आहे. भारतीय बोर्डाने WACA स्टेडियमचा फोटोही शेअर केला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाला या मैदानात दोन सराव सामनेही खेळायचे आहेत.

भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानच्या विरोधात होणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियात आपल्या पहिल्या सामन्याआधी चार वार्म-अप मॅच खेळणार आहे. यामध्ये आसीसीच्या दोन वार्म-अप मॅचचा समावेश आहे. उर्वरीत दोन सामने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघा विरोधात होणार आहेत.

खेळाडूंच्या दुखापतीमुळं टीम इंडियाला मोठा धक्का

दिग्गज खेळाडूंना दुखापत झाल्यामुळं टीम इंडियाची चिंता वाढली आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळं वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. दीपक हुड्डाही पूर्णपणे तंदुरूस्त नाहीय. तर अर्शदीप सिंगही दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिका विरुद्ध तिसरा टी-२० सामना खेळला नाही. टीम इंडियाने बुमराहच्या जागेवर अजूनही कोणत्याच खेळाडूची निवड केली नाहीय. मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, दीपक चहर किंवा उमरान मलिक या खेळाडूंपैकी एकाला टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये सामील करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पूर्ण शेड्युल वाचा सविस्तर

  • वार्म-अप मॅच

  • वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन : 10 ऑक्टोबर

  • वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन : 17 ऑक्टोबर

  • ऑस्ट्रेलिया विरोधात सामना : 17 ऑक्टोबर

  • न्यूझीलंड विरुद्ध सामना : 19 ऑक्टोबर

ऑफिशियल शेड्यूल

  • भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर,दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)

  • भारत विरुद्ध ग्रुप ए रनर अप, 27 ऑक्टोबर, दुपारी 12.30 वाजता (सिडनी)

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर, सायंकाळी 4.30 वाजता (पर्थ )

  • भारत विरुद्ध बांग्लादेश, 2 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता,(एडिलेड)

  • भारत विरुद्ध ग्रुप बी विनर, 6 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार),विराट कोहली,सूर्यकुमार यादव,दीपक हुड्डा,ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर),हार्दिक पंड्या,आर.अश्विन,युजवेंद्र चहल,अक्षर पटेल,भुवनेश्वर कुमार,हर्षल पटेल,अर्शदीप सिंह.

स्टॅंडबाय खिलाड़ी: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT