Virat kohli and Rohit Sharma
Virat kohli and Rohit Sharma Saam TV
क्रीडा | IPL

'आमचं ध्येय विश्वचषकच', शतक ठोकल्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीची घेतलेली मजेशीर मुलाखत वाचा

नरेश शेंडे

दुबई : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात शतक ठोकलं. दोन वर्षानंतर विराटने शतकी खेळी केल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. अफगाणिस्तान विरोधात सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा (Indian Cricket Team) कर्णधार रोहित शर्माने कोहलीची मुलाखत घेतली. यावेळी दोघांमध्ये मजेशीर गप्पा रंगल्या. आमच्या संघासाठी कालचा दिवस खास होता, असं म्हणत विराटने क्रिकेटबाबत अनेक महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केलं. (Indian Skipper rohit sharma takes interview of virat kohli)

आशिया कप २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट संघांचं अंतिम सामन्याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण काल अफगाणिस्तानच्या विरुद्ध झालेला सामना ऐतिहासिक झाला. विराट कोहलीने दोन वर्षानंतर शतकी खेळी केली. त्यामुळे विराटच्या नावावर ७१ शतक झाले असून अफगाणिस्तानच्या विरोधात शतक ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, विराटच्या धडाकेबाज शतकानंतर रोहित शर्माने एक मुलाखत घेतली. ही मुलाखत बीसीसीआईने अपलोड केली आहे. यावेळी विराट म्हणाला, आमच्या संघासाठी हा एक खास दिवस होता. अफगाणिस्तान विरुद्ध आमचा अॅटीट्यूड कसा असेल? याबाबत आम्ही श्रीलंके विरुद्ध सामना झाल्यावर चर्चा केली होती. आमचं ध्येय विश्वचषकच आहे. ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत, त्यासाठी आम्ही काही गोष्टींमध्ये सुधारणा करणार आहोत.

विराट पुढे बोलताना म्हणाला, मी दिर्घ विश्रांतीनंतर मैदानात उतरलो. मॅनेजमेंटने स्पष्टच सांगितलं होतं की, मला खेळूद्या. कर्णधार आणि संघाने माझ्यावर ठेवलेला विश्वास महत्वाचा होता. मी पुनरागमन केल्यानंतर खूप आनंदी होतो. मी चांगलं खेळायचं होतं, कारण पुढे आम्हाला विश्वचषक खेळायचा आहे. माझ्याशी राहुल द्रविड यांनीही चर्चा केली होती.पहिली फलंदाजी करताना स्ट्राईक रेट कसा वाढवता येईल, याबाबत त्यांनी सल्लामसलत केली होती.

रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियाचे स्टार खेळाडू आहेत. मुलाखती दरम्यान दोघंही एकमेकांची खिल्ली उडवताना दिसले. जेव्हा मुलाखत सुरु झाली तेव्हा रोहित शर्मा हिंदीमध्ये बोलत होता. त्यावेळी विराटला हसू आवरला नाही आणि म्हणाला, रोहित माझ्यासमोर किती शुद्ध हिंदी बोलत आहे. दरम्यान, विराट कोहलीने संघातील त्याच्या भूमिकेबाबत सांगितलं की, परिस्थीतीनुसार मला जबाबदारी घ्यायची आहे.

आवश्यकता असल्यास धावांचा पाऊसही पाडायचा आहे. मला माहिती आहे, जर मी १०-१५ चेंडू खेळल्यानंतर आक्रमक खेळी करू शकतो. विराटने केएल राहुलच्या आक्रमक खेळीचं कौतुक केलं. जेव्हा राहुल टी-२० मध्ये धडाकेबाज फलंदाजी करतो तेव्हा खूप गोष्टी सोप्या होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: १० वर्षापूर्वी चहावर चर्चा केली, आता कामावर चर्चा करा; उद्धव ठाकरेंनी PM मोदी- शहांना केलं लक्ष्य

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे गेल्या १० वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? ; कोकणातून राज ठाकरेंची तोफ धडाधडली

साडीत खुललं Sonalee Kulkarni चं मनमोहक सौंदर्य; पाहा अप्सरेचे Photos

Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

SCROLL FOR NEXT