ENG vs IND Saam Tv
Sports

ENG vs IND: तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची २५७ धावांची आघाडी

आजच्या खेळात पुजारा आणि पंत नाबाद परतले.

साम वृत्तसंथा

टीम इंडियाने (India Team) बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ गडी गमावून १२५ धावा केल्या आहेत. यादरम्यान चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी चमकदार कामगिरी केली. पुजाराने अर्धशतक ठोकले. तर पंत ३० धावांवर नाबाद राहिला. आता टीम इंडियाकडे २५७ धावांची आघाडी आहे. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २८४ धावांवर सर्वबाद झाला होता.

टीम इंडियाची (India Team) दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. मात्र चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी डाव सांभाळला. सलामीवीर शुभमन गिल अवघ्या ४ धावा करून बाद झाला. तर हनुमा विहारी ४४ चेंडूत ११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. माजी कर्णधार विराट कोहलीही काही विशेष कामगिरी केली नाही. कोहलीने ४० चेंडू खेळले यात त्याने ४ चौकारांच्या मदतीने २० धावा करून बाद झाला. पुजारा आणि पंत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिले. पुजाराने १३९ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या. त्याने ५ चौकार ठोकले. पंतने ४६ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या. त्याने ४ चौकार ठोकले. भारताने १२५ धावांसह २५७ धावांची आघाडी घेतली.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २८४ धावा केल्या होत्या. जॉनी बेअरस्टोने संघासाठी चांगली कामगिरी करत शतक झळकावले. त्याने १४० चेंडूत १०६ धावा केल्या. यावेळी त्याने १४ चौकार आणि २ षटकार ठोकले. सॅम बिलिंग्सने ५७ चेंडूत ३६ धावा केल्या. या खेळीत ४ चौकारांचा समावेश होता. रूट ३१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ४ चौकार मारले. शेवटी मॅटी पॉट्सने १९ धावा केल्या. त्याने १८ चेंडू खेळत ३ चौकार आणि १ षटकार लगावला.

भारताकडून (India Team) मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली. त्याने ११.३ षटकात ६६ धावा दिल्या. तसेच त्याने ४ विकेट घेतल्या. कर्णधार जसप्रीत बुमरानेही चांगली कामगिरी केली. त्याने ३ जाणांची विकेट घेतली. बुमराहने १९ षटकात ६८ धावा दिल्या. मोहम्मद शमीने २ विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने एक विकेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT