pawan sehrawat saam tv news
Sports

PKL Auctions 2023: पवन सेहरावत बनला प्रो कबड्डी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! लागली तब्बत इतक्या कोटींची बोली

Pawan Sehrawat: पवन सेहरावत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

Ankush Dhavre

Pro Kabaddi 2023 Auction News:

प्रो कबड्डी लीगच्या १० व्या हंगामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरव प्रो कबड्डी लीग स्पर्धेसाठी ऑक्शन सुरु आहे. या ऑक्शनचा पहिलाच दिवशी पवन सेहरावतसाठी ऐतिहासिक ठरला आहे. पहिल्याच दिवशी पवन सेहरावतवर विक्रमी बोली लागली आहे. तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

या स्पर्धेसाठी झालेल्या ऑक्शनमध्ये पवन सेहरावतवर २ कोटी ६० लाख रूपयांची बोली लागली आहे. यापूर्वी देखील पवन सेहरावत प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.

गतवर्षी झालेल्या लिलावात त्याच्यावर तमिल थलाइवाजने त्याच्यावर २ कोटी २६ लाख रूपयांची बोली लावली गेली होती. हा विक्रम मोहम्मदरेजा शादलूने मोडला. पुणेरी पलटनने त्याच्यावर २ कोटी ३५ लाखांची बोली लावली. मात्र अवघ्या काही मिनिटात हा विक्रम मोडला गेला.

पवन सेहरावतला आपल्या संघात स्थान देण्यासाठी सर्वच संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. यूपी योद्धा,तेलुगू टायटन्स, हरियाणा स्टीलर्स आणि बंगळुरू बुल्स या संघांनी बोली लावण्यात कुठलीच कसर सोडली नाही. शेवटी तेलुगू टायटन्सने बाजी मारली आणि २ कोटी ६० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिलं. (Latest sports updates)

मोहम्मदरेजा शादलू ठरला दुसरा सर्वात महागडा खेळाडू..

मोहम्मदरेजा शादलूची बेस प्राईज ३० लाख रूपये इतकी होती. यू-मुंबाने त्याच्यावर पहिली बोली लावली. त्यानंतर बंगाल वॉरियर्स,युपी योद्धा आणि गुजरात जायंट्सने देखील बोली लावायला सुरूवात केली.

मोहम्मदरेजा शादलूला आपल्या संघात स्थान देण्यासाठी या सर्व संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटी पुणेरी पलटनने बाजी मारत मोहम्मदरेजा शादलूला आपल्या संघात स्थान दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT