Women's Cricket Team/File
Women's Cricket Team/File Saam TV
क्रीडा | IPL

Team India : टीम इंडियात मोठी उलथापालथ, हेड कोचला हटवलं; 39 शतके ठोकणाऱ्या खेळाडूची एन्ट्री

Nandkumar Joshi

Team India : भारतीय महिला क्रिकेट संघात मोठा बदल झाला आहे. मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार याला हटवण्यात आलं आहे. तर माजी क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकर याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी याबाबत माहिती दिली.

ऋषिकेश कानिटकर हा आता भारतीय महिला क्रिकेट संघाचा (Team India)  फलंदाजी प्रशिक्षक असणार आहे, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं. ९ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २० मालिका होणार आहेत. त्याआधीच कानिटकर महिला क्रिकेट संघाशी जोडला जाणार आहे. ही मालिका मुंबईत ९ डिसेंबरपासून खेळली जाईल. दुसरीकडे वर्ल्डकप, कॉमनवेल्थ गेम्समध्ये हेड कोच राहिलेले रमेश पोवार आता नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत जाणार आहेत.

रमेश पोवार आता एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या टीममध्ये काम करेल. भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी तो लक्ष्मणसोबत काम करणार आहे. रमेश पोवार म्हणाले की, नव्या जबाबदारीमुळं खूप खूश आहे. महिला क्रिकेट संघासोबतचा अनुभव खूपच चांगला होता. काही वर्षांत दिग्गज खेळाडूंसोबत काम करता आलं. एनसीएमध्ये मिळालेल्या जबाबदारीमुळं खूपच खूश आहे. माझा अनुभव भविष्यातील खेळाडूंच्या उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे. लक्ष्मणसोबत काम करण्यास उत्सुक आहे, असेही पोवार म्हणाला. (Sports News)

कोण आहे ऋषिकेश कानिटकर?

ऋषिकेश कानिटकरने भारतासाठी दोन कसोटी सामने आणि ३४ वनडे सामने खेळलेले आहेत. त्याशिवाय त्याला १४६ प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. डाव्या हाताचा खेळाडू आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत काही खास कामगिरी करू शकला नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये कानिटकरचं नाव आवर्जून घेतलं जातं. कानिटकरनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०४०० धावा केल्या आहेत. त्यात त्यानं ३३ शतके ठोकली आहेत. याशिवाय सहा शतके त्याने लिस्ट ए मध्ये केली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

Thane Naresh Mhaske News | उमेदवारी फॉर्म भरताना दोन गटात राडा, काय झालं बघाच!

Today's Marathi News Live : उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम याचा उमेदवारी अर्ज दाखल

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

SCROLL FOR NEXT