Whether report in Australia T20 world cup saam tv
Sports

India vs Zimbabwe Weather Report: टीम इंडियासाठी व्हिलन बनणार मेलबर्नचं हवामान, कारण...

सामन्यात ऐन वेळी पावसानं खोडा घातल्यास भारतासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

नरेश शेंडे

IND Vs ZIM, T20 वर्ल्डकप 2022 वेदर रिपोर्ट: ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपचा (T20 world cup) थरार सुरू असून भारत सहा गुण प्राप्त करून आपल्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी आहे. पण मेलबर्नचा हवामान भारतासाठी व्हिलन ठरू शकतो. भारतीय संघ रविवारी सुपर12 चा शेवटचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध खेळणार आहे. भारतानं आतापर्यंत चार सामने खेळले असून तीन सामन्यांमध्ये विजय संपादन केलं . (Whether report of Melbourne cricket ground in australia)

भारताला अव्वल स्थानी कायम राहायचं असेल तर, झिम्बाब्वेला (Zimbabwe) पराभूत करावं लागेल. भारत जबरदस्त फॉर्मात असल्यानं झिम्बाब्वे विरोधातही सामना जिंकू शकतो, अशी आशा आहे. परंतु, सामन्यात ऐन वेळी पावसानं खोडा घातल्यास भारतासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्डकप मध्ये पावसानंही खेळ सुरु केला असल्याचं काही सामन्यांदरम्यान पाहायला मिळालं. सेमीफायनलच्या समीकरणातही पावसाचा मोठा रोल होता. भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यातही पावसाचा परिणाम पाहायला मिळाला. अॅडलेड मध्येही पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उशिराने सुरु होणार नाणेफेक?

मेलबर्नच्या मैदानात भारत झिम्बाब्वे विरुद्ध भिडणार आहे. हवामना विभागानं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सात वाजताच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसानं हजेरी लावल्यास नाणेफेक उशिराने होऊ शकते. परंतु, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी आहे. पिच रिपोर्टनुसार, गोलंदाजांना नवीन चेंडूनं चांगली मदत मिळेल. त्यामुळे फलंदाजांना सावध खेळी करावी लागेल. एमसीजी मध्ये बाऊंड्री लाईन मोठी असल्यानं फिरकीपटुंचाही रोल महत्वाचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT