ind vs usa twitter
Sports

IND vs USA,Playing XI: शिवम दुबे अन् जडेजाला डच्चू? या दोघांना मिळेल स्थान; अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Team India Playing XI Prediction: आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

Ankush Dhavre

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला जोरदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडला तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला नमवत भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. भारतीय संघाचा तिसरा सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर होणार असून, भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होईल. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मात्र अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ काही मोठे बदल केले जाऊ शकतात. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये शिवम दुबे आणि रविंद्र जडेजाला संधी दिली गेली आहे. मात्र दोन्ही सामन्यांमध्ये दोघांनाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. शिवम दुबेऐवजी संजू सॅमसनचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. तर जडेजाच्या जागी कुलदीप यादवचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी म्हटलं जात होतं की, रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करताना दिसून येतील. मात्र गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डावाची सुरुवात केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही हीच जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. त्यामुळे पुन्हा एकदा यशस्वी जयस्वालला आपल्या संधीची वाट पाहावी लागणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

SCROLL FOR NEXT