Rahul Dravid  Saam TV
Sports

Ind Vs SL: उद्योजकाचा पोरगा ठरला पहिल्या T20 सामन्याचा हिरो, राहुल द्रविडच्या सल्ल्याने झाले स्वप्न साकार

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात रोमहर्षक विजयानंतर टीम इंडियाने विजयी सुरूवात केली आहे. या सामन्यातून एका बड्या उद्योगपतीच्या मुलानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पदार्पण केले.

Gangappa Pujari

Ind Vs SL T20 Siries: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात रोमहर्षक विजयानंतर टीम इंडियाने विजयी सुरूवात केली आहे. या सामन्यातून एका बड्या उद्योगपतीच्या मुलानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पदार्पण केले. वडिल मोठे उद्योजक, मुलाला डॉक्टर, इंजिनिअर बनवण्याची इच्छा होती. मात्र मुलाने क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. आणि ही इच्छा त्याने दणक्यात पदार्पण करत पुर्णही केली.

तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोण आहे हा खेळाडू? तर आम्ही बोलतोय पहिल्या सामन्याचा हिरो शिवम मावीबद्दल..

श्रीलंकेविरुद्धच्या (Srilanka) पहिल्या क्रिकेट सामन्यात शिवम मावीने दमदार पदार्पण केले. आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात त्याने चार बळी घेत धमाका केला. त्यामुळेच पहिल्या सामन्याचा हिरो शिवम मावीचे सध्या सर्वत्र जोरदार कौतुक होताना दिसत आहे. एक काळ असा होता की शिवम मावीला दुखापतीमुळे क्रिकेटमध्ये पाऊल ठेवता येईल की नाही, अशीही शंका होेती. मात्र सहा वर्ष त्याने या संधीची वाट पाहिली, आणि टी ट्वेंटी सामन्यात दमदार पदार्पण केले.

शिवम मावीने आपल्या पहिल्याच सामन्यात जोरदार प्रदर्शन केले. आणि सर्वात जास्त कौतुक झाले ते प्रशिक्षक राहुल द्रविडचे (Rahul Dravid). कारण राहुल द्रविडच्या पारखी नजरेने शिवमची क्षमता आधीच ओळखली होती. स्वतः शिवम मावीनेही त्याच्या संपूर्ण यशाचे श्रेय राहुल द्रविडला दिले होते.

शिवम मावीमधील क्षमतेचा अंदाज राहुल द्रविडला तो १९ वर्षीय भारतीय संघात असतानाच झाली होती. शिवममधील क्षमतेचा अंदाज आल्यानेच करिअरमध्ये तो कुठेही भरकटला जाऊ नये यासाठी त्याला कानमंत्र दिला होता. डोक्यात कधीही पैशाची हवा जाऊ देऊ नकोस, हवा फक्त क्रिकेटची जाऊ दे, असा सल्ला त्याने शिवम मावीला दिला होता. राहुल द्रविडचा हाच सल्ला लक्षात ठेवत मावीने आपली वाटचाल सुरू ठेवली आणि पहिल्याच सामन्यात चार बळी घेत आपली योग्यता सिद्ध केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT