Ind vs SA 3rd T20 Team India Latest Update (BCCI) SAAM TV
क्रीडा

Ind Vs SL: ज्याच्या फटकेबाजीची तुलना थेट सेहवागशी व्हायची, त्यालाच संघातून डच्चू; 'या' खेळाडूच्या करिअरला लागले ग्रहण?

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन टी ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ind Vs Srilanka Siries: श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन टी ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये अनेक आश्चर्यकारक बदल संघामध्ये करण्यात आले आहेत. एकदिवसीय सामन्यांचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले आहे तर टी ट्वेंटीमध्ये ही जबाबदारी हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे.

मात्र ज्या खेळाडूच्या आक्रमक फलंदाजीची तुलना थेट विरेंद्र सेहवागशी केली जाते. त्या पृथ्वी शॉला मात्र संघातून डच्चू मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संघात कमबॅक न करु शकल्याने त्याच्या करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ( Indian Cricket Team)

पृथ्वी शॉने आपल्या करिअरची जोरदार सुरूवात केली होती. आपल्या धडाकेबाज आणि वादळी खेळीने गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या शॉच्या खेळीने सर्वांनाच दखल घ्यायला लावली होती. त्यामुळेच या खेळाडूची तुलना थेट विरेंद्र सेहवागशी केली जात होती. मात्र हा धडाकेबाज फॉर्म त्याला कायम ठेवता आला नाही. करिअरच्या सुरूवातीला दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या या प्रतिभावान खेळाडूची बॅट अलिकडे तळपली नसल्याने त्याच्या करिअरला ग्रहण लागल्याचे दिसत आहे. (Srilanka)

आपल्या आत्तापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दित पृथ्वी शॉने ५ कसोटीमध्ये ३३९ धावा केल्या आहेत. तर भारतासाठी त्याने एकमेव टी ट्वेंटी सामना २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. दरम्यान आता येणाऱ्या आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT