Rohit Sharma
Rohit Sharma saam tv
क्रीडा | IPL

Ind vs Srilanka ODI Series: एक धाव अन् सामना विजय! रोहितच्या नावावर होणार मोठ्या विक्रमाची नोंद, धोनी- द्रविडही फेल

Gangappa Pujari

Ind vs Srilanka 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि मालिकेतील शेवटचा सामना आज तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. आधीचे दोन्हीही सामने जिंकून भारतीय संघाने मालिका आधीच खिशात घातली आहे. आता तिसरा सामनाही जिंकत थेट व्हाईटवॉशची संधी भारतीय संघाकडे आहे.

त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या नावावरही एक मोठा विक्रमही नोंद होऊ शकतो. फक्त त्यासाठी या सामन्यात रोहितने एक धाव आणि भारताने हा सामना जिंकायला हवा. काय आहे हा विक्रम चला जाणून घेवू. (Rohit Sharma)

भारत आणि श्रीलंका (Srilanka) यांच्यामधील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एक धाव काढताच त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंद होणार आहे. रोहितने आतापर्यंत सर्व क्रिकेट प्रकारात भारताच्या विजयात एकूण 11999 धावांचे योगदान दिले आहे.

अशात पुढील सामन्यात त्याला 12000 धावांचा आकडा करण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आहे. तसेच, त्याला भारताला विजयदेखील मिळवून द्यावा लागेल. भारताने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-0ने आघाडी विजयी घेतली आहे.

दरम्यान, आतापर्यंत विराट कोहलीआणि सचिन तेंडुलकर या दोन दिग्गजांनी हा कारनामा करून दाखवला आहे. माजी कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाच्या विजयात एकूण 16119 धावांचे योगदान दिले आहे. तसेच, अव्वलस्थानी असलेल्या सचिन तेंडुलकरने भारताच्या विजयात एकूण 17113 धावांचे योगदान दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT