team india twitter
Sports

IND vs SL,1st ODI: राहुल की पंत;रोहित कोणाला संधी देणार? पहिल्या सामन्यासाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

Team India Playing XI Prediction: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिकेचा थरार पार पडला. आता दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. या मालिकेला २ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल. तर विराट कोहली आणि कुलदीप यादवसारखे प्रमुख खेळाडू या मालिकेत कमबॅक करताना दिसून येणार आहेत. हार्दिक पंड्याने वनडे मालिका खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तो या मालिकेत खेळताना दिसून येणार नाही.

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये होणाऱ्या टी -२० मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल सलामीला फलंदाजी करताना दिसतील. हे दोघेही भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करून देऊ शकतात.

तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर विराट पहिल्यांदाच वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. यासह श्रेयस अय्यर या मालिकेत कमबॅक करताना दिसून येणार आहे. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.

यष्टिरक्षक म्हणून केएल राहुलला संघात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे रिषभ पंतला विश्रांती दिली जाऊ शकते. सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी शिवम दुबेचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

तर अष्टपैलू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे दोघेही फिरकी गोलंदाजांच्या भूमिकेत दिसतील. यासह वेगवान गोलंदाज म्हणून हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीरा-भाईंदर शहरात बकरी ईद सणाच्या बकरा कुर्बानीवर पालिकेचे निर्बंध

Fitness Tips : जिमसारखी बॉडी हवी? मग दिवसाला किती अंडी खावी, जाणून घ्या

Mumbai Crime: मुंबई हादरली! एअर होस्टेसवर बलात्कार, तृतीयपंथी असल्याचे सांगत घरात घुसला अन्...

अभिजीत दिपकेंनी काल मागितला राजीनामा; आज शिक्षणमंत्र्यांनी दिली कबुली, काय म्हणाले वाचा!

Marriage Tips: यंदा लग्न ठरलंय? मग, गाडी-घरापेक्षा जोडीदारामध्ये 'हे' ४ गुण नक्की तपासा, संसार होईल सुखी

SCROLL FOR NEXT