durban twitter
Sports

IND vs SA, Weather Update: मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा कसं असेल हवामान

India vs South Africa 3rd T20I, Weather Prediction: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? वाचा सविस्तर.

Ankush Dhavre

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ४ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार कमबॅक केलं आणि अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाचा शेवटच्या षटकात पराभव केला. दरम्यान मालिकेतील तिसरा सामना १३ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? जाणून घ्या.

या सामन्याला भारतीय वेळेनुसार, रात्री ८:३० वाजता सुरुवात होईल. तर टॉस ८ वाजता होईल. accuweathe ने दिलेल्या वृत्तानुसार, १३ नोव्हेंबरला संध्याकाळच्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता ही केवळ ८ टक्के इतकीच असणार आहे. आभाळ मोकळं असेल. संध्याकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत पाऊस पडण्याचा कुठलाही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्सला २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळाला आहे.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रेकॉर्ड पाहिला, तर भारतीय संघाचं पारडं जड राहिलं आहे. आतापर्यंत दोन्ही संघ २९ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १६ सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला १२ सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, आवेश खान ,यश दयाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

Maharashtra News Live Update : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात भीषण अपघात

Weekly Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

नजर होईल गरुडासारखी तीक्ष्ण! रोज खा 'हे' ५ ड्रायफ्रुट्स, भविष्यात कधीही चष्मा लागणार नाही

Bollywood Actor : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने केले वार, प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT