team india  saam tv news
Sports

Ind vs Sa, 2nd Test, Day 2: हिशेब चुकता करण्याची संधी! फक्त ७९ धावा करून टीम इंडिया घडवणार केपटाऊनमध्ये इतिहास

India vs South Africa 2nd test: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँड्समध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

Ind vs Sa, 2nd Test, Day 2 Live Update:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँड्समध्ये सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १७६ धावांवर संपुष्टात आला आहे. दरम्यान भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ७९ धावांची गरज आहे.

मार्करमचं शतक, बुमराहच्या ६ विकेट्स..

दक्षिण आफ्रिकेचा संघ ज्यावेळी दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आला त्यावेळी भारतीय संघ ३६ धावांनी आघाडीवर होता. तर दक्षिण आफ्रिकेचे ३ फलंदाज माघारी परतले होते. भारतीय संघाला केवळ ७ फलंदाजांना बाद करायचं होतं.

भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. मात्र एडन मार्करमने एक बाजू धरून ठेवली होती. त्याने एका बाजूने तुफान फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने ९९ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. त्याच्या या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेला भारतीय संघावर आघाडी घेता आली. (Latest sports updates)

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ६ गडी बाद केले. त्याने १३.५ षटकात ६१ धावा खर्च करत या ६ फलंदाजांना माघारी धाडलं.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ६ गडी बाद केले. या डावात दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ५५ धावांवर आटोपला. दरम्यान प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला १५३ धावा करता आल्या. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने १७६ धावा करत भारतीय संघाला ७९ धावांचं आव्हान दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT