IND vs SA:  Twitter
Sports

IND vs SA 2nd T20I: दुसऱ्या सामन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार? काय सांगतो हवामानाचा अंदाज?

India vs South Africa Weather Update: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी -२० सामन्यात कसं असेल हवामान? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IND vs SA 2nd T20I Weather Prediction: डरबनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ६१ धावांनी विजय मिळवला. यासह ४ टी -२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता दुसरा सामना जिंकून भारतीय संघ टी -२० मालिकेत २-० ने आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

मालिकेतील पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने वादळी शतकी खेळी केली. मात्र संजू सॅमसनला वगळता, कुठल्याही फलंदाजाला आपली छाप सोडता आली नव्हती. सूर्यकुमार यादवला चांगली सुरुवात मिळाली होती.

मात्र तो चांगल्या सुरुवातीचं रूपांतर मोठ्या खेळीत करू शकला नव्हता. तर दुसरीकडे झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्माला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे हे फलंदाज दुसऱ्या सामन्यातून कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.

कसं असेल हवामान?

AccuWeather ने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी -२० सामन्यावेळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हा ११ टक्के इतका असणार आहे.

तर नाणेफेकीच्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता ही ४९ ते ५४ टक्के इतकी असणार आहे. तर सामन्यातील दुसऱ्या डावात पाऊस पडण्याचा अंदाज ४० टक्के इतका असणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता कमी आहे. पण पावसामुळे अडथळा नक्की निर्माण होऊ शकतो.

खेळपट्टी कोणाला देणार साथ?

हा सामना सेंट जॉर्ज पार्कमध्ये रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. मात्र सामना जसा पुढे जाईल, तशी खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत करेल. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो.

या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेने या मैदानावर ४ सामने खेळले आहेत. त्यापैकी ३ सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवता आला आहे. तर १ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT