team india playing 11 prediction  google
Sports

IND vs SA, Team India Playing XI: दुसऱ्या वनडेतून टीम इंडियाचा स्टार खेळाडू बाहेर! या फलंदाजाला मिळणार संधी; पाहा प्लेइंग ११

Team India Playing 11 Prediction: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये दुसरा वनडे सामना रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa, Playing XI Prediction:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जाईल. हा सामना सेंट जॉर्ज पार्कच्या मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने १-० ची आघाडी घेतली आहे.

त्यामुळे आज होणारा सामना जिंकून भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

सेंट जॉर्ज पार्कच्या मैदानावर रंगणार दुसरा सामना..

पहिल्या सामन्यात दमदार खेळ केल्यानंतर भारतीय संघ दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४:३० वाजता सुरू होईल. गेल्या सामन्यात गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती.

तर फलंदाजांनी धावांचा यशस्वी पाठलाग करत भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला होता. मात्र तरीही या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात. श्रेयस अय्यर टी-२० मालिकेतील उर्वरीत २ सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाहीये. त्याच्याऐवजी रिंकू सिंग किंवा रजत पाटीदारला संधी दिली जाऊ शकते.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

के. एल. राहुल (कर्णधार व यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, संजू सॅमसन, अक्षर पटेल, , अर्शदीप सिंग, आवेश खान, रिंकू सिंग, आकाश दीप, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर,कुलदीप यादव, मुकेश कुमार.

असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ:

एडन मार्करम (कर्णधार), ओटनिल बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी झोरझी, रिझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज,वियान मुल्डर, आंदिल पेहलुकवायो, रॅसी वॅन डर ड्युसेन, तबरेझ शम्सी, लिझाड विलियम्स, काईल वेरेनी,डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोंगवाना. (Latest sports updates)

पहिल्या सामन्यात भारताचा जोरदार विजय..

भारतीय संघाने या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूर्णपणे फसला.

कारण दक्षिण आफ्रिकेचा डाव ११६ धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने ८ गडी राखून हा सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या अडचणीत वाढ

DIG च्या मुलीनं आयुष्याचा दोर कापला, AIIMS नागपूरमध्ये घेत होती शिक्षण

Shreya Ghoshal Concert: श्रेया घोषालच्या कॉन्सर्टवेळी चेंगराचेंगरी; स्टेजजवळ हाणामारी, दोघे बेशुद्ध; पाहा VIDEO

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकला, जालना हादरलं

SCROLL FOR NEXT