rohit sharma test google
Sports

Team India Fined By ICC: टीम इंडियाला दुहेरी धक्का! द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर ICC ने केली मोठी कारवाई

IND vs SA 1st Test: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाला दुहेरी धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

Team India Fined By ICC:

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी धक्का बसला आहे. दारुण पराभवानंतर भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत २ गुण गमवावे लागले आहेत. तर मॅच फीवर १० टक्के दंड आकारण्यात आला आहे. भारतीय संघाला या सामन्यात १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या कसोटी सामन्यात भारतीय संघ आवश्यक ओव्हर रेट राखून ठेवता आला नाही. त्यामुळे आयसीसीने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने निर्धारीत वेळेपेक्षा दोन षटके कमी टाकली आहेत.

काय सांगतो आयसीसीचा नियम?

आयसीसीच्या आचारसंहितेच्या अनुच्छेद २.२२ नुसार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना प्रत्येक षटकासाठी ५ टक्के दंड ठोठावला जातो. स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी आढळणाऱ्या संघांवर ही कारवाई केली जाते.

भारतीय संघात मोठा बदल..

या मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या ३ ते ७ जानेवारी दरम्यान खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी आवेश खानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला मोहम्मद शमीची रिप्लेसमेंट म्हणून संघात स्थान दिलं गेलं आहे. (Latest sports updates)

दक्षिण आफ्रिकेचा जोरदार विजय..

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलने १०१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २४५ धावा केल्या. या धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ४०८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या धावांचा भारतीय संघाला यशस्वी पाठलाग करता आला नाही. हा सामना भारतीय संघाला १ गडी ३२ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT