IND vs Pak: Saam tv
Sports

IND Vs PAK Match Winner: पाकिस्ताननं गुडघे टेकले; टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय, विराट-राहुलनंतर कुलदीपनं नाचवलं

IND vs Pak Asia Cup News and Update: आशिया कप स्पर्धेचा भारत विरुद्ध पाकिस्तानचा हायव्हॉल्टेज सामना झाला. या सामन्यात टीम इंडियावर पाकिस्तानवर २२८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Vishal Gangurde

India vs Pakistan Asia Cup 2023 News in Marathi:

रोहित शर्मा आणि शुभमन गिलची अर्धशतकी खेळी, केएल राहुल, विराट कोहलीचा शतकी तडाखा आणि कुलदीप यादवनं फिरकीवर नाचवत घेतलेल्या ५ विकेट्समुळं भारतानं पाकिस्तानवर आजवरचा सर्वात मोठा विजय मिळवला.

आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील हायव्होल्टेज सामन्यात भारतानं पाकिस्तानवर २२९ धावांनी विजय मिळवला. विराट कोहली, केएल राहुल आणि कुलदीप यादव हे या सामन्याच्या विजयाचे शिल्पकार ठरले. (Latest Marathi News)

टीम इंडियाने सुपर-४ स्टेजमध्ये पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर २२८ धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला ५० षटकात २ गडी गमावून ३५६ धावांचं आव्हान दिलं होतं.

टीम इंडियाने दिलेल्या धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. पाकिस्तानचे इमाम-उल-हक आणि कर्णधार बाबर आझम स्वस्तात माघारी परतले. इमाम हा ९ धावांवर बाद झाला तर बाबर हा १० धावांवर बाद झाला. यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता.

पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला. पावसामुळे सामना तब्बल १ तास थांबवण्यात आला होता. सामना सुरु झाल्यावर पाकिस्तानची पडझड सुरूच राहिली. शार्दुलने पहिल्याच षटकात मोहम्मद रिझवानला बाद केले.

त्यानंतर कुलदीप यादवने फखर जमान, सलमान अली आगा , शादाब खान ,इफ्तिखार अहमद आणि फहीम अशरफला बाद केले. कुलदीप यादवने या सामन्यात तब्बल पाच गडी बाद केले.

तत्पूर्वी, या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी खेळली. विराट कोलहीने नाबाद १२२ धावा कुटल्या तर केएल राहुलने १११ धावा कुटल्या. तर रोहित शर्मा आणि शुबमन शर्मा यांनी अर्धशतक ठोकलं. टीम इंडियाने ५० षटकात २ गडी गमावून ३५६ धावा कुटल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT