वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स २०२५ मध्ये आज होणारा भारत पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात आलाय. पहलगाम हल्ल्याचा परिणाम क्रिेकेटच्या खेळावर झालाय. पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताकडून ऑपरेशन संदूर राबवत दहशतवादी तळं उद्धवस्त करण्यात आली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. युद्धपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी घोषित करण्यात आली असली तरी दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. त्याचा प्रचिती क्रिकेट सामन्यांवरून दिसून आली.
लंडनमध्ये होणाऱ्या WCL 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झालाय. सामना का रद्द करण्यात आला याचे कारण आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच सामना रद्द झाल्यामुळे त्यांनी चाहत्यांची माफी मागितली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर, पाकिस्तानने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर भारताच्या दिग्गज क्रिकेटपटू आणि चाहत्यांची माफी मागितलीय. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सने अधिकृत निवेदन जारी करत भारतीय खेळाडू आणि चाहत्यांच्या भावना अनवधानाने दुखावल्याबद्दल माफी मागितलीय.
आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. आम्ही फक्त चाहत्यांसाठी आनंददायक क्षण निर्माण करू इच्छित होतो. पण आमच्या निर्णयामुळे जर भारतीय क्रिकेट दिग्गजांची किंवा चाहत्यांची भावना दुखावली असतील तर आम्ही मनापासून माफी मागतो.” पाकिस्तानच्या इतर खेळांसारखेच (हॉकी, व्हॉलीबॉल) क्रिकेटमध्येही भारत-पाकिस्तान सामने घडवून आणण्याचा प्रयत्न होता, पण त्यामागे कुठलाही राजकीय हेतू नव्हता.
पण या प्रयत्नात आपण अनेक लोकांच्या भावना दुखावल्या असतील आणि त्यांच्या भावना भडकवल्या असतील”. तर माफी मागतो,असं निवेदन पाकिस्तानकडून जारी करण्यात आले आहे. आम्ही अनवधानाने आमच्या भारतीय क्रिकेट दिग्गजांना त्रास दिलाय. ज्यांनी देशाला अभिमान दिला आणि आम्हाला पाठिंबा देणाऱ्या ब्रँड्सला प्रभावित केलंय. म्हणूनच आम्ही भारत आणि पाकिस्तानमधील सामना रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.
युवराज सिंग (कर्णधार), सुरेश रैना, शिखर धवन, गुरकीरत सिंग, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा (यष्टीरक्षक), अंबाती रायुडू (यष्टीरक्षक), अभिमन्यू मिथुन, हरभजन सिंग, पवन नेगी, पियुष कुमार, वरुष कुमार, वरुण कुमार, वरुण कुमार.
शाहिद आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद हाफीज शर्जील खान, कामरान अकमल, युनूस खान, शोएब मलिक, मिसबाह-उल-हक, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), अब्दुल रज्जाक, वहाब रियाझ, सईद अजमल, सोहेल तन्वीर, सोहेल खान, आसिफ अली, सोहेब मकसूद
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.