asia cup  saam tv
क्रीडा

Asia Cup 2023: ..तर भारत- पाकिस्तानात रंगणार आशिया चषकाचा अंतिम सामना! असं असेल समीकरण

India vs Srilanka,Asia Cup 2023: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पून्हा एकदा आमने सामने येऊ शकतात.

Ankush Dhavre

Asia Cup 2023 Points Table:

आशिया चषक २०२३ स्पर्धेचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. या स्पर्धेत आता सुपर ४ फेरीतील सामने सुरू आहेत. मंगळवारी झालेल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ४१ धावांनी मिळवला आहे. यासह भारतीय संघाने अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. आता या विजयाचा फायदा पाकिस्तानला देखील होणार आहे.

भारतीय संघाने या विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता भारतीय संघाचा पुढील सामना बांगलादेश संघासोबत रंगणार आहे. तर श्रीलंकेचा संघ पाकिस्तानसोबत दोन हात करताना दिसून येणार आहे. या सामन्यात जर पाकिस्तानने श्रीलंकेला हरवलं तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना पाहायला मिळू शकतो. हा सामना येत्या १७ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला तर श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. अशा स्थितीत भारत विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना पाहायला मिळू शकतो. (Latest sports updates)

भारताचा दणदणीत विजय...

भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली.

तर केएल राहुलने ३९ आणि ईशान किशनने ३३ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने या डावात २१३ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने ४१ आणि वेलालागेने नाबाद ४२ धावांची खेळी केली. मात्र या दोघांची खेळी व्यर्थ गेली, कारण श्रीलंकेचा संघ विजयापासून ४१ धावा दूर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT