India vs Pakistan Asia Cup 2022 Saam Tv
Sports

हार्दिक पंड्याने 'MS Dhoni' च्या स्टाईलने सामना केला फिनीश, दिनेश कार्तिकने मैदानावर ठोकला सलाम (Video)

आशिया चषक स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत स्पर्धेची शानदार सुरुवात केली.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: आशिया चषक स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत स्पर्धेची शानदार सुरुवात केली. हार्दिक पंड्याने भारताच्या विजयात अप्रतिम कामगिरी केली आणि १७ चेंडूत नाबाद ३३ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. पंड्याने गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली आणि चार षटकांत २५ धावा देत तीन बळी घेतले. हार्दिक (Hardik Pandya) आणि जडेजाच्या खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या षटकात हा सामना जिंकला. रवींद्र जडेजाने २९ चेंडूत ३५ धावा केल्या. दोघांनी मिळून ५२ धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (India vs Pakistan Asia Cup 2022)

अखेरच्या षटकात रविंद्र जडेजा बाद झाला, त्यानंतर टीम इंडियाची धकधक वाढली. हार्दिक पंड्याने फिनिशरची भूमिका चोख बजावली आणि शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून सामना संपवला. हार्दिकच्या (Hardik Pandya) स्टाईलमध्ये चाहत्यांना धोनीची आठवण झाली.

शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी ७ धावांची गरज होती. मोहम्मद नवाजने पहिल्याच चेंडूवर जडेजाला बाद करून सामन्याचा थरार शिगेला नेला. त्यानंतर दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कार्तिकने धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर हार्दिकला धावा करता आल्या नाहीत. भारताला शेवटच्या ३ चेंडूत ६ धावांची गरज होती. आता चौथ्या चेंडूवर मोहम्मद नवाजने शॉर्ट लेंथवर हार्दिकला बोल्ड केले, ज्यावर पंड्याने जोरदार खेळी करत षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.

पंड्याने षटकार मारून सामना संपवताच नॉन स्ट्राइकवर उभा असलेला कार्तिक त्याच्याकडे गेला आणि त्याने डोके टेकवून सलामी दिली आणि अभिनंदन केले. कार्तिकने ज्या प्रकारे हार्दिकच्या कामगिरीला सलाम केला, त्याने चाहत्यांची मने जिंकली. (India vs Pakistan Asia Cup 2022)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढळले मृतदेह अन्...

Housing Society Rules: हाउसिंग सोसायटीत नियम मोडला तर दंड कोणाला लागतो? घरमालक की भाडेकरू?

SCROLL FOR NEXT