न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संंघात अचानक बदल करण्यात आला आहे saam tv
Sports

Ind vs NZ : कसोटी मालिकेआधीच भारतीय संघात मोठा बदल; कुलदीप यादवला मायदेशी धाडलं, नव्या खेळाडूची अचानक एन्ट्री

Ind vs NZ test series kuldeep yadav released gurnoor brar selected : न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेआधी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. कुलदीप यादवला मायदेशी धाडणार असून, त्याच्या जागी नव्या दमाच्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. सध्या वनडे मालिका सुरू आहे. यातील अखेरचा सामना १५ नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने आधीच संघाची घोषणा केली आहे. मात्र, आता त्यात एक बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार, कुलदीप यादवला रिलीज करण्याचा निर्णय निवड समितीनं घेतला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज गुरनूर बरार याची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.

अखेरच्या वनडेतही होणार बदल

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यांत गुरनूर बरार यानं चांगली कामगिरी केलीय. त्याची दखल निवड समितीकडून घेतली गेल्याचं दिसतंय. त्याला कसोटी मालिकेत संधी देण्यात आली आहे. त्यानं तीन सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी मालिका खेळणार असल्यानं पाचव्या वनडे सामन्यात तो खेळू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. पाचव्या वनडेत त्याच्या जागी अद्याप कोणत्याही खेळाडूची निवड जाहीर केली नाही. तर कुलदीप यादवला कसोटी संघातून रिलीज करण्यात आलं आहे. तो मायदेशात परतणार असून, देशांतर्गत क्रिकेट सामने खेळणार आहे.

पंत आला रे आला...

बऱ्याच महिन्यांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेला ऋषभ पंत या पुनरागमन कधी करणार असा प्रश्न विचारला जात होता. आता याचं उत्तर मिळालंय. न्यूझीलंड कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधीच पंत तंदुरुस्त झाला होता. बीसीसीआयच्या माहितीनुसार, पंत हा वेलिंग्टनमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.

भारताचा सुधारित कसोटी संघ पुढीलप्रमाणे -

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिकल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, साई सुदर्शन, आकाश दीप, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, गुरनूर बरार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी मिळणार?

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

Aloo Matar Masala Recipe: हॉटेलसारखी चविष्ट आलू मटर मसाला भाजी घरीच बनवा, वाचा 'ही' सोपी रेसिपी

BJP Resignation : भाजपला जोरदार धक्का, ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्यानं सोडली साथ

Skin Care : चेहऱ्यावर हवा आहे नैसर्गिक ग्लो? रोज खा हे ५ पदार्थ, त्वचा दिसेल चमकदार

SCROLL FOR NEXT