रोहित शर्मा आणि विराट कोहली  Saam TV
Sports

रोहित, विराट अन् श्रेयस आले अन् भोपळाही न फोडता गेले, पहिल्याच षटकात भारताचे ३ फलंदाज बाद

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड चौथ्या वनडे सामन्यात ३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. मॅट हेन्रीने पहिल्याच निर्धाव षटकात रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांना शून्यावर बाद केले.

Namdeo Kumbhar

India vs New Zealand 4th ODI score : चौथ्या वनडे सामन्याती भारतीय संघाची अतिशय खराब सुरूवात झाली. आघाडीचे ३ फलंदाज खातेही न उघडता पहिल्याच षटकात माघारी परतले. ३३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचे ३ धुरंधर फलंदाज माघारी परतले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच षटकात एकही धाव न काढता ३ फलंदाज बाद होण्याची पहिलीच वेळ आहे. ऋतुराज गायकवाड आणि इशान किशान मैदानावर आहेत.

३३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि ऋतुराज गायकवाड मैदानावर उतरले होते. न्यूझीलंडकडून मॅट हॅनरी याने गोलंदाजीची सुरूवात केली. मॅट हॅनरीने पहिलं षटक निर्धाव टाकले. त्याशिवाय रोहित शर्मा, विराट कोहली आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांना शून्यावर बाद केले. वनडे इतिहासात निर्धाव षटक अन् ३ विकेट बाद होण्याची पहिलीच वेळ आहे. रोहित, विराट आणि अय्यर या दिग्गज फलंदाजांच्या बॅटला चेंडूही लागला नाही.

३३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अतिशय खराब झाली. २ षटकानंतर भारताने २ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट गमावल्या आहेत. ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन सध्या मैदानावर आहेत. आघाडीचे ३ फलंदाज बाज झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून टीका केली जात आहे. सध्या गायकवाड आणि किशन यांना भागिदारी करण्याची गरज आहे.

न्यूझीलंडचे भारतासमोर ३३४ धावांचे आव्हान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत सर्व १० विकेटच्या मोबदल्यात ३३३ धावा केल्या आहेत. यामुळे भारतासमोर विजयासाठी ३३४ धावांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

विल यंगचे शानदार शतक:

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला जीवदान मिळालेल्या विल यंगने या जीवनाचा पुरेपूर फायदा उठवत शानदार फलंदाजी केली. त्याने १०८ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०८ चेंडूत १२५ धावांची धमाकेदार शतकी खेळी केली. याशिवाय टिम सिफर्टने ४८ चेंडूत ५८ धावा (६ चौकार, ३ षटकार) आणि फिन आलनने ३० चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत फलंदाजांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे न्यूझीलंडला ३०० चा पल्ला ओलांडणे शक्य झाले. न्यूझीलंडचा डाव ५० व्या षटकाच्या अंतिम चेंडूवर ३३३ धावांवर संपुष्टात आला.

भारताची गोलंदाजी:

भारतीय गोलंदाजांपैकी अक्षर पटेलने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत १० षटकांत केवळ ३९ धावा देत २ बळी टिपले. तसेच गुरनूर ब्रार (२/६९) आणि आकिब नबी (२/५९) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अर्शदीप सिंग आणि नमन धीर यांना प्रत्येकी १-१ यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Power Nap : पॉवर नॅप किती मिनिटांची असावी? १०, २० की ३० मिनिटं; जाणून घ्या योग्य वेळ

किचनमध्ये चाकू कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तुशास्त्र काय सांगते?

Maharashtra News Live Update: सरकारी इमारती आणि मंत्र्यांच्या बंगल्यांचे होणार फायर ऑडिट; वनमंत्री गणेश नाईकांची मुख्य सचिवांकडे मागणी

ITR Deadline 2026 : 21 नोव्हेंबरपूर्वी ही 3 कामं करा! एक चूक पडेल महागात, भरावा लागू शकतो दंड

Bigg Boss 20: लव गिलसोबतच्या वादानंतर स्काउट ओपीने केलं टक्कल; ढसाढसा रडताना दिसला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT