team india twitter
Sports

IND vs NZ 3rd Test: मुंबई कसोटीसाठी टीम इंडियात बदल! स्टार गोलंदाजाला मिळणार संधी

India vs New Zealand 3rd Test, Harshit Rana: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टार गोलंदाजाला संधी दिली जाऊ शकते.

Ankush Dhavre

Harshit Rana: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याला १ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ २-० ने पिछाडीवर आहे.

त्यामुळे भारताने मालिका तर गमावली आहे. मात्र WTC च्या दृष्टीने मालिकेतील शेवटचा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या सामन्यात हर्षित राणाला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हर्षित राणा १ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करु शकतो. हर्षितने मंगळवारी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात शानदार कामगिरी केली.

या गोलंदाजीच्या बळावर दिल्लीने १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात गोलंदाजी करताना हर्षितने पहिल्या डावात ५ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ७ गडी बाद केले.

भारतीय संघाचे माजी निवडकर्ते आणि दिल्लीचे प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' तो (हर्षित) कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे. ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी त्याने मुंबई कसोटी खेळणं गरजेचं आहे. '

हर्षित राणा काय म्हणाला?

आसामविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना राणा म्हणाला की,' टीम मॅनेजमेंटने मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी सांगितलं होतं. मला आनंद आहे की, मी फलंदाजी आणि गोलंदाजीच चांगली कामगिरी केली आहे.' हर्षित राणाला यापूर्वी टी-२० संघातही स्थान दिलं गेलं आहे. मात्र त्याला पदार्पणाची संधी दिली गेली नव्हती.

भारत- न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वाॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT